रस्त्याचा मुद्द्यावर सत्ताधारीच तोंडघशी; आता विरोधकांच्या हाती आयते कोलीत! 

रस्त्याचा मुद्द्यावर सत्ताधारीच तोंडघशी; आता विरोधकांच्या हाती आयते कोलीत! 

On the issue of the road, the ruling party is sloppy; Now in the hands of opponents!

..मग पालिकेला टार्गेट करून राष्ट्रवादी (ए) ने काय मिळवले?So what did the NCP achieve by targeting the municipality?

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir19July , 18.30 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : २५ लाखाचा निधी मंजूर असूनही गेल्या दीड वर्षापासून आपल्या प्रभागातील अयेशा कॉलनीतील रस्ता होत नाही, उगाच पालिकेच्या नावावर चिखलात खेळ मांडून राष्ट्रवादी (ए) हे युवा शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी यातून सत्ताधाऱ्यांचीच  नाकामी उघड करून दिली आहे. आता विरोधी पक्षीयांना आमदारविरोधासाठी आणखी वेगळे मुद्दे शोधण्याची गरजच पडू नये. आणि  तसेच झाले विरोधकांनी  याचे भांडवल करून थेट आमदार यांच्या कार्यक्षमतेवरच प्रसिद्धी पत्रकातून हल्ला चढविला.

प्रभागातील एका रस्त्याच्या मुद्द्यावर  राष्ट्रवादी युवा काँग्रेस चे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी शुक्रवारी (दि१९) रोजी प्रभागातील जनता जमवून थेट रस्त्यातील चिखलात बसून मोठा हंगामा करून आ. आशुतोष काळे यांनी या रस्त्यासाठी २५ लाखाचा निधी मंजूर करून दिला आहे परंतु गेल्या दीड वर्षापासून पालिका रस्ता करीत  नसल्याचा आरोप करीत पालिकेला खलनायक ठरवून तातडीने हा रस्ता न केल्यास पालिका कार्यालयात चिखलाने अंघोळ करणार असल्याचा थेट इशाराच नवाज कुरेशी यांनी प्रसारमाध्यमासमोर दिला आहे. यावरून विरोधकांना आयते  कोलीत  मिळाल्याने  भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे यांनी थेट आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 
यावेळी टीका करताना साठे यांनी पत्रकार म्हटले आहे की हजारो कोटीच्या वल्गना  करणाऱ्या खोट्या प्रसिद्धीचे बिंग फुटले यातून जनतेचा बेगडी कळवळा प्रदर्शिणारे सत्ताधारी तोंडघशी पडले आहेत.केंद्रीय योजना आणि शासनाने द्याव्या लागणाऱ्या नागरिकांच्या हक्काच्या योजनांचे श्रेय घेण्यात धन्यता मानली,पण प्रत्यक्ष जनतेचे प्रश्न त्यांच्या सोयीच्या ठेकेदारी प्रवृत्तीमुळे सुटले नाहीत, प्रभागातला साधा रस्ता होत नसेल म्हणून स्वतःचे पदाधिकारी चिखलात बसून आंदोलन करत असतील तर मग कोट्यावधीचा निधी आणणा-या सत्ताधारी लोकप्रतिनिधीने  काय मिळवले, केवळ  मोठा गाजावाजा करण्यातच त्यांनी धन्यता मानली. असे साठे यांनी स्पष्ट केले 
 दहा कोटीचा रस्ता अल्पावधीत खड्डेमय झाला पाण्याच्या बाबतीतील हलगर्जीपणा शहराला पाणी संकटात घेऊन जात आहे. आश्वासने देऊन विकास होत नाही. कोट्यवधी रुपये निधीची तरतूद प्रत्येक सरकार करत असते पण तो निधी प्राप्त होतोच असे नाही तर त्यातील काही प्रमाणात निधी प्रत्यक्ष विकासाला प्राप्त होतो याकडे साफ दुर्लक्ष करून निव्वळ जनतेला झुलवत ठेवण्याचे काम काळे यांनी केले आहे. आमदार काळे जर एवढे निधी आणल्याची वाच्यता करतात, फलकबाजी करतात तर एक साधा प्रभागातील रस्ता का झाला नाही याची खंत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आहे. नगरपालिकेला विविध माध्यमातून नियमित मिळणारा निधी देखील माझ्यामुळे आला असे नसलेले श्रेय घेऊन काळे यांनी मोठा गाजावाजा करण्यातच धन्यता मानली असल्याची टीका साठे यांनी पत्रकातून केली आहे
  निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने आपले हसू  करून घेतले असल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळणे स्वाभाविक आहे. विरोधक भाजपाची पत्रकबाजी सुरू झाल्याने यात  राष्ट्रवादीचीच कोंडी झाली आहे. 
 

Leave a Reply

You cannot copy content of this page