दहा कोटीच्या रस्त्याचे पितळ उघडे पडले; आमदार काळेंनी ठेकेदार व उपअभियंत्याला झापले
Ten crore road brass exposed; MLA Kale attacked the contractor and sub-engineer
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Thu18July,18.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : राज्यमार्ग ६५ च्या झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या १० कोटीच्या अल्पावधीत तीन तेरा वाजले असून रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचे पितळ उघडे पडले आहे यावरून आमदार आशुतोष काळे यांनी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे कोपरगाव उपअभियंता यांना चांगलेच झापले. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत
शासनाच्या विविध विभागाकडून मतदारसंघातील रस्त्यांसाठी साडे चार वर्षात ४६० कोटी रुपयांचा निधी आणूनही लोकांना त्रास होणार असेल आणि त्यांच्या तक्रारी येणार असेल तर कोणाचीही गय करणार नाही आणलेल्या निधीतून रस्त्यांची कामे दर्जेदार करा नागरिकांना त्रास झाल्यास खपवून घेणार नाही निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळया यादीत टाका, अन्यथा परिणामास तयार राहा, असा स्पष्ट इशारा आमदार आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वर्षराज शिंदे यांना दिला आहे.
रस्त्याची कामे घ्या म्हणून आपल्याला कोणी आग्रह केला नव्हता परंतु घेतलेली रस्त्याची कामे दर्जेदार करण्याचे जमत नसेल तर अशा ठेकेदारांनी यापुढे कामे घेऊ नये ज्या ठेकेदारांनी निष्कृष्ट कामे केली आहेत त्या ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काळया यादीत टाकावे अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी एका रस्त्याच्या पाहणी करताना अधिकाऱ्यांना दिल्या.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्यमार्ग ६५ च्या झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या रस्त्याची कार्यकर्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यासमवेत पाहणी केली.या दहा कोटीच्या रस्त्याची अवघ्या काही महिन्यातच धूळधाण झाल्याचे बघून संतप्त झालेल्या आमदार आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वर्षराज शिंदे व ठेकेदार यांची चांगलीच खरडपट्टी केली.
पाहणी दरम्यान संतप्त व व्यतीत झालेल्या आमदार काळे यांनी मतदारसंघातील नागरिकांनी खराब रस्त्यांचा खूप त्रास सोसला आहे. नागरिकांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी रस्त्यांची दर्जेदार कामे होऊन नागरिकांना टिकावू व मजबूत रस्ते मिळणे अपेक्षित आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी मी निधी कमी पडू दिला नाही व भविष्यात देखील कमी पडू देणार नाही. मात्र यापुढील काळात रस्त्यांच्या बाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यास खपवून घेणार नाही. ज्या ठेकेदाराकडून रस्त्यांची निकृष्ट कामे होतील त्या ठेकेदारांना काळया यादीत टाका मात्र खराब रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा आ.आशुतोष काळे यांनी दिला आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वर्षराज शिंदे, रविंद्र चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय शिंदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे, गंगाधर औताडे, प्रविण शिंदे, शंकरराव चव्हाण, माजी संचालक आनंदराव चव्हाण, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन बापूराव जावळे, संचालक बापूसाहेब वक्ते, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक शंकरराव गुरसळ, राष्ट्रवादी सोशल मेडिया सेल जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र औताडे, तालुकाध्यक्ष महेंद्र वक्ते, किसनराव पाडेकर, गोकुळ गुरसळ, केशव जावळे, युवराज गांगवे, किरण पवार, नंदकिशोर औताडे, सिकंदर इनामदार, कल्याण गुरसळ, किरण वक्ते, विलास चव्हाण, शिवाजी होन, विनोद रोहमारे, प्रवीण होन, बर्डे सर, प्रशांत होन, विजय पवार, गोकुळ पाचोरे, मयुर रोहमारे, राजेंद्र पाचोरे, नरेंद्र रोहमारे, गोकुळ कांडेकर, नरहरी रोहमारे, बाळासाहेब औताडे, प्रभाकर जावळे, भाऊसाहेब सोनवणे, भरत पवार, चांगदेव शिंदे, अमोल पाडेकर, विलास जाधव, संजय रोहमारे, शंकरराव गुरसळ, किसन काटकर, किरण होन, संदीप पवार, सचिन होन, ठेकेदार जगताप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
या १० कोटीच्या रस्त्याच्या कामापासूनच दैनिक पुण्यनगरीने वारंवार या रस्त्याबाबत लिहून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते परंतु यानंतर ही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले कसाबसा रस्ता पूर्ण करून घेतला परंतु आता अधिकारी आणि ठेकेदार यांच्या साटेलोटेचे पितळ थेट आमदार आशुतोष काळे यांच्या समोरच उघडे पडले आहे.
Post Views:
80