संयुक्त महाराष्ट्र व गोवा मुक्ती संग्रामात शाहिरा॓चे योगदान मोठे होते– आ. आशुतोष काळे
Shahira’s contribution was great in the liberation struggle of Maharashtra and Goa. Mla. Ashutosh Kale
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir19July , 19.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: महाराष्ट्राच्या जडणघडणीतआणि परिवर्तनाबरोबर संयुक्तमहाराष्ट्र व गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये अग्रणी म्हणून प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे गौरवउद्गार आ. आशुतोष काळे यांनी गुरुवारी कोपरगाव येथील स्मारक येथे पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करताना व्यक्त केले.
याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या थोर समाज कार्याला उजाळा देतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक या माध्यमातून समाजासाठी अजोड योगदान देवून आपल्या साहित्यातून सर्व सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडली. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.