संजीवनी एम.फार्मसीच्या १२ विद्यार्थ्यांना थेट बहुराष्ट्रीय औषध निर्माण कंपन्यांत नोकरी

संजीवनी एम.फार्मसीच्या १२ विद्यार्थ्यांना थेट बहुराष्ट्रीय औषध निर्माण कंपन्यांत नोकरी

12 students of Sanjeevani M.Pharmacy directly employed in multinational drug manufacturing companies

संजीवनीतच शिक्षण, पदवी आणि नोकरी सर्व इच्छा पूर्ण होतात Education, degree and job all desires are fulfilled in Sanjeevan

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir19July , 18.30 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव :  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (एसजीआय) संचलित संजीवनी एम.फार्मसी महाविद्यालय  ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने १२ एम . फार्मसी विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय  औषध निर्माण कंपन्यांत आकर्षक  पगारावर नोकरी करण्याची संधी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मिळाले असल्याची माहिती संस्थेच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

संजीवनी फार्मसी कॉलेज
संजीवनी एम. फार्मसीला  ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्याने औषध निर्माण कंपन्यांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक संशोधनात्मक अभ्यासक्रमाचा समावेश  करण्यात आलेला आहे. यामुळे कामाच्या अनुभवासोबतच आवडत्या विषयात पदवी व उच्चशिक्षण पूर्ण होत आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांनी दिली.
कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत हक्काची नोकरीही मिळाली आणि शिक्षणही पूर्ण होत असल्याचे समाधान व आनंद आहे. अन्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेत जीवनाचा मार्ग प्रशस्त करावा,अशा भावना आज या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
  विविध बहुराह्स्त्रीय  कंपन्यांनी निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अलेम्बिक फार्मा कंपनीने जीवन ज्ञानेश्वर  सोमवंशी , वैष्णवी  विलास वाळेकर व सुरभी संतोष  भंडारी यांची निवड केली आहे. एमक्युअर फार्मा प्रा. लि. कंपनीने प्रियमाला एकनाथ अवचर व आदिती विजय मोमाळे यांची निवड केली आहे. एलिसियम फार्मा कंपनीने संकेत कृष्णाकुमार जोशी  याची तर ग्लेनमार्क फार्मा कंपनीने सिध्दी नितीन जोषी व श्रध्दा शांताराम  फटांगरे यांची निवड केली आहे. आयपीसीए फार्मास्युटिल्स कंपनीने महेश  संतोष  निखाडे व तेजस सुधाकर झाल्टे यांची निवड केली आहे. लुपिन फार्मा कंपनीत अभिजीत चंद्रकांत पालवे याची तर मार्कसन फार्मा कंपनीत अवेश  अस्लम तांबोळीची निवड झाली आहे.
            एसजीआयचे अध्यक्ष  नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक, डायरेक्टर डॉ. विपुल पटेल व ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ.निलेश  पेंडभाजे यांचे अभिनंदन केले आहे.     

Leave a Reply

You cannot copy content of this page