पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरूणाची हत्या; सहा जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल
Murder of a young man on suspicion of having an affair with his wife; A case of murder has been registered against six persons
तीन आरोपी अटक तीन फरार काही काळ पोलीस स्टेशनमध्ये तणाव Three accused arrested three absconding Tension in police station for some time
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Mon22July , 18.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून एका तरुणाला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. शहर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपींना अटक करून सहा आरोपींविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. याची तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत. आरोपींना अटक करावी यासाठी मुस्लिम समाजाचे कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला ठिय्या केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी(दि२१)रोजी रात्री आठ साडेआठ वाजेच्या सुमारास टावर जवळ भूमी अभिलेख कार्यालयजवळ पत्नीसोबत अफेर असल्याचे संशयावरुन सोहेल हारुन पटेल (२८)रा आयशा कॉलनी कोपरगाव मारहाण केली. मॅजीक क्रमांक महा.१५ ई ४७९५ मध्ये टाकुन कर्मवीर नगर मध्ये जावेद जमशेर शेख यांचे शेतीच्या प्लॉटमध्ये घेवुन जावुन तेथे सोहेल हारुन पटेल यास लाकडी दांडयाने, चाकुने, लोखंडी खिळे असलेल्या बांबुने दोन्ही हातावर, डोक्यावर, दोन्ही पायावर, अंगावर, ठिकठिकाणी भोसकुन दांडक्याने मारहाण करुन त्याला गंभीर जखमी करुन जिवे मारुन टाकले आहे. अशी फिर्याद मयताचा भाऊ शाहरुख हारुन पटेल, (वय २५) धंदा भंगार व्यवसाय, रा. आयशा कॉलनी, कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दिली होती सदर फिर्यादीवरून यातील आरोपी मच्छिद्र सोनवणे ऊर्फ मच्छु, स्वप्नील गायकवाड, महेश कट्टे,विकी परदेशी,विकीचा मित्र नाव माहीती नाही.योगेश जाधव ऊर्फ पोंग्या सर्व रा. कोपरगावयांच्या विरोधात भारतीय न्याय संहीता कलम १०३ (१),११८ (१),(१४२), १४० (१),१८९ (२) १८९(४),१९०.१९१(२),१९१(३), प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
दत्तात्रय कलुबर्ग अप्पर पोलीस अधोक्षक सो. श्रीरामपुर, शिरिष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी सो, शिर्डी विभाग शिडी यांनी भेट दिली असून पोलीस निरिक्षक प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा आहे करीत आहे
Post Views:
90