गोकुळधाम गोरक्ष केंद्राचे गोरक्षण व गोसेवेचे निरंतर दिड तपाचे कार्य यज्ञीय -मंगेश पाटील 

गोकुळधाम गोरक्ष केंद्राचे गोरक्षण व गोसेवेचे निरंतर दिड तपाचे कार्य यज्ञीय -मंगेश पाटील 

Gokuldham Goraksh Kendra’s continuous hard work of cow protection and cow service is sacrificial – Mangesh Patil

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Tue23July , 18.20 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : भगवान महावीर युवा प्रतिष्ठान कोपरगाव संचलित गोकुळधाम गोरक्षा केंद्र कोकमठाण तालुका कोपरगावच्या माध्यमातुन आजतागायत शासनाच्या कोणत्याही सहकार्याशिवाय निस्वार्थपणे गेल्या दिड तपापासुन गोरक्षण व गोसेवेचे निरंतर व अविरत चालु असलेले कार्य यज्ञीय यज्ञ असल्याचे गौरवउद्गार कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी  गोकुळधाम गोरक्ष केंद्राच्या अठराव्या वर्धापन दिनी व्हेजिटेबल केक कापताना व्यक्त केल्या. 

मंगेश पाटील पुढे म्हणाले की, १७ वर्षांपूर्वी गुरु पौर्णिमेच्या दिवशी अवघ्या सात गोवंशावर चालू झालेले हे गोसेवा केंद्र आज हजारो गोवंशाचे जीव वाचवत आहे आणि पशुधनाचे योग्य संगोपन करत आहे.गोमाता व ईश्वर सदैव माझ्या सोबत आहे.हे गोरक्षणाचे व गोसेवेचे कार्य देखील तेच माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या माध्यमातुन करवुन घेत आहेत. 
   
 वेळोवेळी दानशुर गोभक्ताच्या माध्यमातुन सहकार्य करण्यासाठी पुढे येत आहे. याचे सर्व श्रेय मी  सतत सतरा वर्ष अविरत गो सेवेचे व्रत हातात घेऊन गोरक्षा केंद्राची हे सर्वजण कुठल्याही प्रकारच्या नावाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे काम करणारे माझे सहकारी शिखरचंद जैन , मनोज अग्रवाल,  राजेश ठोळे , संजय भन्साळी , संजय बंब , संदीप लोढा, प्रसाद नाईक  ,गोपीशेठ लोंगणी , सत्येन मुंदडा , हिरेन पापडेचा, ओंकार भट्टड , प्रणित कातकडे , जय बोरा , सद्गुरु जोशी  , राजेंद्र देवरे , शिर्डी येथील दर्शन वैद्य ,  आदी उपस्थित व्यापारी वर्गाला व गोसेवक यांना देतो. अशी कृतज्ञता मंगेश पाटील यांनी शेवटी व्यक्त केली. 
यावेळी कोपरगाव शहर  पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख  व सौ सविता देशमुख उभयतांनी गोसेवा केंद्राला भेट  देऊन या ठिकाणी  वृक्षारोपण केले  यावेळी  केंद्राचे वतीने श्री व सौ देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. 

चौकट 

१८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आगळावेगळया व्हेजिटेबल केक कापून व सर्व गोवंशाला वैरण चारा व फळे खाऊ घालण्याची  गोसेवा पार पाडण्यात आली ,  यावेळेस गो शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page