कोपरगावकरांच्या पाणी संकट मुक्ततेसाठी पाच नंबर साठवण तलाव  मैलाचा दगड ठरणार ! सुनील गंगुले

कोपरगावकरांच्या पाणी संकट मुक्ततेसाठी पाच नंबर साठवण तलाव  मैलाचा दगड ठरणार ! सुनील गंगुले

Five storage ponds will be a milestone for Kopargaonkar’s relief from water crisis! Sunil Gangule

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Tue23July , 18.30 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी  १३१.२४ कोटीची पाणी योजना आणली यामुळे   कोपरगावकरांची पाणी संकटातून मुक्तता करण्याच्या  दिशेने हे मोठे पाऊल असून पाच नंबर साठवण तलाव कोपरगावकरांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले  यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

कोपरगाव शहरातील नागरिक मागील काही वर्षापासून तीव्र पाणी टंचाईची झळ सोसत होते. महिला भगिनींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. कधी दहा ते पंधरा दिवस व उन्हाळ्यात तर २१ दिवसांनी कोपरगाव शहराला पाणी पुरवठा होत होता. यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी 2019 च्या निवडणुकीत कोपरगावकरांना पाण्याबाबत दाखविलेले स्वप्न होऊ घातलेल्या पाच नंबर साठवण तलावाच्या निमित्ताने सत्यात उतरत आहे यामुळे कोपरगावकरांची पाण्यासाठीची होणारी ससे होलपट कायमची थांबणार आहे  असून विकासाची नांदणी नांदी ठरणार असल्याचे गंगुले यांनी पत्रकात म्हटले आहे.

या साठवण तलावाला विरोधकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे विरोध करण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील केला असला तरी हे सर्व प्रयत्न आ. आशुतोष काळे यांच्या निर्धारापुढे टिकाव धरू शकले नाही. आ. आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी दिल्यामुळे या निधीतून भव्य दिव्य साठवण तलाव उभारला आहे.पाण्याचे जलकुंभ देखील उभे राहिले असून वितरण व्यवस्थेचे काम देखील पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. साठवण तलावाच्या चोहोबाजूंनी भक्कम आर. सी.सी.भिंत असल्यामुळे पाणी चोरी देखील होणार नाही.साठवण तलावाचे काम सुरु झाल्यापासून कोपरगाव शहरातील बहुतांश नागरिकांनी विशेषत: महिला भगिनींनी स्वत: जाऊन ५ नंबर साठवण तलावाचे सुरु असलेले काम पाहिले आहे. त्यामुळे संपूर्ण कोपरगावकर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस आ. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून लवकरच उगवणार असून कोपरगावकरांची तहान भागविणारा ५ नंबर साठवण तलाव कोपरगावच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page