शनिवारी महाराष्ट्र बंद’च्या हाकेला कोपरगावमहाविकास आघाडीचा पाठिंबा,

शनिवारी महाराष्ट्र बंद’च्या हाकेला कोपरगावमहाविकास आघाडीचा पाठिंबा,

Kopargaon Mahavikas Aghadi’s support to the call of Maharashtra bandh onSaturday,

कोपरगावकरांना बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन

An appeal to Kopargaoners to join the bandh

शाळा कॉलेजच्या बंद ठेवा शनिवारी (२४ ऑ.) दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात निषेध सभाKeep schools and colleges closed,Protest meeting at Chhatrapati Shivaji Maharaj Smarak Chowk on Saturday (24th) at ten o’clock

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Thu22 Aug 19.10 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या हाकेला  कोपरगाव महाविकास आघाडीने सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दिला आहे तर या बंदमध्ये सर्व कोपरगावकरांनी सामील व्हावे असे आवाहन कोपरगाव  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे

शाळेतील सफाई कामगारांनी दोन निरागस मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी बदलापूर मध्ये उमटले होते ‘बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यातील महिला आणि  मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने या बंदमध्ये कोपरगावातील सर्व स्तरातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ तसेच सर्व मराठी इंग्लिश प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने शाळा बंद ठेवाव्यात असे नम्र आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.  
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता इंदिरा शॉपिंग सेंटर येथील शिवसेना सेना शहर कार्यालय येथे महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत कोपरगाव बंद ठेवण्याचा निर्णय कोपरगाव महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आला
शनिवारी 24 ऑगस्ट रोजी कोपरगाव बंद ठेवून तमाम कोपरगावकरांनी सकाळी दहा वाजता निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी जमावे असे आव्हान  कोपरगाव महाविकास आघाडी कडून करण्यात आले आहे
 
‘‘ दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी बदलापूरमध्ये लोकांनी मोठे जनआंदोलन केले . मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मात्र या प्रकरणी हात झटकले,  लाठी चार्ज करून ते आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिंदे गटाचा नगराध्यक्ष महिला पत्रकाराविरुद्ध अश्लील भाषा वापरतो शिंदे, फडणवीस,व पवार या त्रिकुटाला फक्त राज्य ताब्यात हवे राज्यात बाल अत्याचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. केवळ वांझोटा निषेध करून भागणार नाही यासाठी समाजात जागरूकता यावी यासाठी सामाजिक संघटना पक्ष यांनी जबाबदारी घेतली पाहिजे भाजप महायुतीचे  सरकार अत्यंत अकार्यक्षम, भ्रष्ट आहे. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा किंवा राज्यपाल यांनी हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा उपसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केली.
बदलापूरमध्ये मुलींवर झालेल्याअत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासल्या गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर आणि  मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये फिर्याद उशिरा दाखल केली का ?  म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे का?
बदलापुरच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी डॉक्टर, वकील, पालक यांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करावा,’’ असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांनी यांनी केले. 
यावेळी कैलास जाधव राखी विसपुते यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
या बैठकीला शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे, कैलास जाधव, शिवाजी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते संदीप वर्पे, शहराध्यक्ष स्वप्निल पवार, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव नितीन शिंदे, शहराध्यक्ष तुषार पोटे यासह प्रमोद लबडे, सनी वाघ, कलविंदर सिंग दडियाल, कालूआप्पा आव्हाड, भरत मोरे, रवी कथले, राखी विसपुते, वर्षा शिंगाडे,  इरफान शेख, प्रकाश शेळके, राहुल देशपांडे, अतिश बोरुडे, अक्षय निकुंब, पप्पू पडियार, रंजन जाधव, सिद्धार्थ शेळके, विजय जाधव आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी  उपस्थित होते.
पत्रकारांचे स्वागत व प्रास्ताविक शहर प्रमुख सनी वाघ यांनी केले शेवटी आभार शिवाजी ठाकरे यांनी मानले

Leave a Reply

You cannot copy content of this page