सबजेलचा जागता पहारा आणि सीसीटीव्हीच्या नजरेतून महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ट्रॉलीसह चार ट्रॅक्टर चोरून नेले 

सबजेलचा जागता पहारा आणि सीसीटीव्हीच्या नजरेतून महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ट्रॉलीसह चार ट्रॅक्टर चोरून नेले 

Four tractors along with a trolley were stolen under the nose of the revenue administration under the watchful eye of Subjail and CCTV.

अव्वल  कारकूनची शहर पोलिसात तक्रार, स्वातंत्र्यदिनी चोरट्यांचा आत घुसून ट्रॅक्टर चोरीचा सर्जिकल स्ट्राइक Top Clerk’s Complaint to City Police, Surgical Strike of Thieves to Intrude and Steal Tractor on Independence Day

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Fir23 Aug 18.10 Am.By सालकर राजेंद्र

 

कोपरगाव  : कोपरगाव  तहसील कार्यालयाच्या आवारात सब जेलचा जागता पहारा आणि सीसीटीव्हीच्या नजरेतून स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट दरम्यान महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून  ट्रॉल्यासह चार ट्रॅक्टर  ५.५० लाखाच्या मुद्देमाल चोरून नेला जातो याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून उलट सुलट चर्चा सुरू आहे

याबाबत पोलिसांकडून मिळालेली  माहिती अशी की
 अवैध गौण खनिज विरोधी पथकाने तालुक्यामध्ये विनापरवाना वाळू उत्खनन व वाळू वाहतूक करताना मिळून आलेले विलास भगीरथ चांडे यांच्या मालकीचा स्वराज्य कंपनीचा विना नंबरचा ट्रॅक्टर वर ट्रॉली किंमत एक लाख, सचिन मंडलिक थोरात यांच्या मालकीचा सोनालिका कंपनीचा निळ्या रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा, सचिन जाधव यांच्या मालकीचा विना नंबरचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॉली एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा, व विलास अंबादास लांडे यांच्या मालकीचा स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा असा एकूण पाच लाख ५० हजार रुपये किमतीचा  कारवाईत  जप्त करुन  कोपरगाव तहसील कचेरीच्या आवारात लावले होते परंतु १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या दरम्यान हे चारही ट्रॅक्टर ट्रॉल्यासह चक्क प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोरून नेल्याची घटना कोपरगाव तहसील कार्यालयात घडली आहे याप्रकरणी अव्वल कारकून देवराम बुधा लांघे राहणार जेऊर पाटोदा  यांनी कोपरगाव शहर पोलिसात तक्रार दिली आहे सदर तक्रारीवरून  कोपरगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे  शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन तमनर हे पुढील तपास करीत आहेत.

चौकट

 विशेष म्हणजे या आवारात शेजारीच दुय्यम कारागृह आहे, तेथे चोवीस तास पहारा आहे, सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत, असे असतांना ट्रॅक्टर चोरीस जातात कसे? त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  त्यामुळे साशंकता व्यक्त केली जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या  काळात चोरट्यांनी थेट आत घुसून ट्रॅक्टर चोरीचा सर्जिकल स्ट्राइक करून तहसीलदार महेश सावंत व शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे या नव्यानेच हजर झालेल्या दोन्ही अधिकाऱ्यांना  थेट आव्हान दिले आहे.     

 

 

 

 

                        

Leave a Reply

You cannot copy content of this page