कोपरगाव शहर पोलिसांनी चार टन गोमास पकडले; नऊ लाखाच्या मुद्देमालासह दोघांना अटक
Kopargaon city police seized four tonnes of beef; Two arrested with 9 lakh worth of valuables
श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी बजरंग दल व गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांची मोठी कारवाईOn Shravani Monday and Gokulashtami, a big police operation with the help of Bajrang Dal and Cow Guards
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Mon26 Aug 15.10 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संगमनेरवरून छत्रपती संभाजीनगरकडे चार टन गोमांस घेऊन जाणारा टेम्पो कोपरगाव शहर पोलिसांनी बजरंग दल हिंदुत्ववादी संघटना गोरक्षकांच्या मदतीने धडक व मोठी कारवाई करत पकडला, चार टन गोमास व आयशर टेम्पो असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
जाकिरखान नसिरखान पठाण (चालक) वय ४९ वर्ष रा. देविगल्ली, मोगलपुरा संगमनेर, फारुक कासम शेख वय ५९ वर्ष रा. सेवकनगर, के. ए. रोड, जरी मारी कुर्ला वेस्ट, मुंबई – 400072 हल्ली रा. जमजम कॉलनी संगमनेर या दोघांना अटक करण्यात आली असून यांच्याविरोधात कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिडी कडुन एक विटकरी रंगाच्या आयशर टेम्पो नं. MH 17 BY 0489 मध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे गोमांस भरुन सदरचा टेम्पो हा समृध्दी महामार्गाचे टोलनाक्यावरुन समृध्दी महामार्गावरुन हा संभाजीनगरच्या दिशेने जाणार असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यानुसार पोलिसांनी समृद्धी टोल नाक्याच्या आडोशाला पो.हे.कॉ. बाबासाहेब यांनी पो.स.ई. रोहिदास ठोंबरे तसेच पो.हे. कॉ. किशोर जाधव यांनी सापळा लावून सोमवारी पहाटे सव्वाचार वाजता समृध्दी महामार्गाचे टोलनाक्यावर जेऊरकुंभारी ता. कोपरगाव येथे आयशर कंपनिचा टेम्पो क्र. MH 17 BY 0489. विटकरी रंगाचा टेम्पो थांबवला चालकाला खाली उतरुन टेम्पो मध्ये काय माल आहे असे विचारले असता चालकाने उडवाडवीचे उत्तरे दिल्याने पो. स.ई. रोहिदास ठोंबरे यांनी तेथे आलेल्या बजरंगदलाचे कार्यकर्ते शिवम अमृतकर, आकाश देवकर, किरण सुर्यवंशी बॅटरीचे लाईटच्या उजेडामध्ये टेम्पोची पाठीमागील बाजुची ताडपत्री वरती करुन पाहीले असता सदर टेम्पो मध्ये गोवंश जातीच्या जनावराचे गोमांस भरलेले दिसुन आल्याने आम्ही सदर टेम्पोची तपासणी केली. टेम्पोमध्ये चार हजार किलो वजनाचे कापलेले गोमांस मिळाले. याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यावरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो व चार लाख रुपये किमतीचे चार टन गोमांस असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पो.काँ./ 2461 बाळु भाऊराव धोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ. किशोर जाधव अधिक तपास करीत आहेत. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप दहे यांनी मासांचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत.
चौकट
पोलीसानी जप्त केलेले गोमांस चार टन दाखवले असले तरी ते प्रत्यक्षात दहा ते बारा टन असल्याचा अंदाज गोरक्षकांनी पत्रकारांशी बोलतांना केला. एवढया मोठया प्रमाणावर गोवंश कत्तल झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Post Views:
41