कोपरगावात पहिल्यांदाच जेष्ठ मंचाकडून”आदर्श सासू पुरस्कार”; अपर जिल्हाधिकारी कोळेकरांच्या हस्ते

कोपरगावात पहिल्यांदाच जेष्ठ मंचाकडूनआदर्श सासू पुरस्कार”अपर जिल्हाधिकारी कोळेकरांच्या हस्ते

“Adarsh ​​Sasu Award” from Jeshta Mancha for the first time in Kopargaon;  Hands of Additional District Magistrate Kolekar

ज्येष्ठांना  शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करणार -= बाळासाहेब कोळेकरOn behalf of the government, senior citizens will be helped to the best of their ability – = Balasaheb Kolekar

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!, Mon26 Aug 15.00 Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : समाजसेवा कार्यात सातत्याने सक्रिय असलेल्या कोपरगांव येथील ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती यांच्या वतीने पहिल्यांदाच आदर्श सासू पुरस्काराचे वितरण शिर्डी विभागीय अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी जेष्ठ नागरिक मंच ज्येष्ठ महिला समितीला शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे व त्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार असल्याचे आश्‍वासन दिले.

कृष्णाई मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी आदर्श सासू पुरस्कार सन्मान सोहळ्याप्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. श्रीमती शकुंतलाबाई मोतिलाल शिंगी, श्रीमती पुष्पा आत्माराम जोशी, श्रीमती कांचनबाई धनालाल काले, सौ. शिला पद्माकांत कुदळे, सौ. कलावती नितीनदादा कोल्हे, सौ. शोभा सुभाष मुंदडा यांना उत्कृष्ठ सासु पुरस्कार तर मिना हिराचंद गंगवाल, छायासंजय तांबट व प्राजक्ता प्रकाश श्रॉफ या तिन महिलांच्या पती निधनानंतर संसार सांभाळला म्हणून शाल,श्रीफळ बुके व सन्मानचिन्ह देवून ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समितीच्या वतीने आदर्श सासू पुरस्कार अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई  काळे, प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमाच्या संचालिका राजयोगिनी सरला दीदी  मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.        

उपस्थितांचे स्वागत कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले  तर प्रास्ताविक करतांना अध्यक्षा सौ. सुधा कैलासचंद ठोळे यांनी सातत्याने वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देतांना आदर्श सासु पुरस्कारासारखा उपक्रम राबवतांना सासु सुनांमधला संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या आधी कोपरगांवात आदर्श बालक,आदर्श शाळा, आदर्श माता,आदर्श नागरीक पुरस्कर देवून सन्मानित केले होते परंतु या वर्षी आम्ही आदर्श सासू पुरस्कार पहिल्यांदाच घेवून महिलांना सन्मानित केले.. महिला समितीच्या अध्यक्षा रजनी गुजराथी यांनी महिला समितीच्या कार्याचा आढावा सादर केला. ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय कोल्हे यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे सामाजिक दायित्व मोठे असून त्यांच्या कार्याला सातत्याने सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
या कार्यक्रमप्रसंगी उद्योगपती कैलासचंद ठोळे, विधिज्ञ जयंत जोशी, निवासी नायब तहसिलदार चंद्रशेखर कुलथे व गटविकास अधिकारी पाठक,अध्यक्ष सौ. सुधा कैलासचंद ठोळे, रजनी गुजराथी अध्यक्षा, ज्येष्ठ महिला समिती, सदस्या सौ. शैलेजा रोहोम, कोपरगांव ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले, विजय बंब कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, योग तज्ञ सचिव उत्तमभाई शहा, सदस्य डॉ. विलास आचारी, एस.एल. कुलकर्णी, वसंतराव आव्हाड, पेंटर दारूवाला, विजय ससाणे अनिल पांढरे, बापू इनामके,नंदकुमार शिवरकर, संजीवनी एज्युकेशन संस्थेचे अमित कोल्हे, सुमित कोल्हे,नितीन डोंगरे, आदि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश गोरे, डॉ.विलास आचारी,  ॠतिका ठोळे यांनी केले तर आभार विजय बंब यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page