कोपरगावात होम मिनिस्टर व गौरी गणपती आरास स्पर्धा – सौ. चैताली काळे 

कोपरगावात होम मिनिस्टर व गौरी गणपती आरास स्पर्धा – सौ. चैताली काळे 

Home Minister and Gauri Ganapati Aras Competition in Kopargaon – Mrs. Chaitali Kale

महिलांनी  आपला सहभाग नोंदवावा; Women should register their participation;

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Tue10 Sep 16.30 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव :  महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो शनिवारी सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचा आगमन झालं त्यानंतर मंगळवारी १० सप्टेंबर रोजी घरोघरी गौरी विराजमान झाल्या. 

राज्यभरासह कोपरगावात  गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या निमित्ताने गौरीच्या सजावटीसाठी वेगवेगळी आरास करण्यात येते.राज्यभरासह अनेक ठिकाणी गौरी सजावटीच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. कोपरगावात आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली याहीवर्षी शहरातील महिलांसाठी गौरी गणपती आरास स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.  महिलांनी मोठ्या संख्येने  आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन चैताली काळे यांनी केले आहे.
गौरी गणपतीच्या सजावटीमध्ये आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटी सर्वत्र पाहायला मिळतात. त्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्याचा व यानिमित्ताने महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठीच घरगुती गणपती सजावट स्पर्धा तसेच गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सौ.चैताली काळे यांनी दिली आहे. 
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी इको फ्रेंडली साहित्यापासून केलेल्या आपल्या घरगुती गणपती सजावटीचे तसेच गौरी सजावटीचे फोटो ८४६८८१४०६६ या व्हाट्सअप क्रमांकावर १४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page