विधानसभेपूर्वीच रिक्षा संघटनेने हेरलं; ‘त्या’ बॅनरची जोरदार चर्चा
Even before the assembly, the rickshaw association spied; A strong discussion of ‘that’ banner
त्या’ सूचक बॅनरमध्ये काय म्हटलं? ‘
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Tue10 Sep 10.30 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : बॅनरमध्ये काय म्हटलं? “जो घेईल हाती मशाल त्याच्याच मस्तकी लागेल गुलाल” असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे कोपरगाव चा आमदार मशालचाच होणार असा आशय या बॅनरचा असून या बॅनरवर रिक्षा संघटना गणेश उत्सव मंडळ यांच्याकडून गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या या बॅनरवर कोणाचेही नाव घेण्यात आलेले नाही मात्र सूचक आवाहन केलेल्या या बॅनरचा रोख हा कोल्हे गटाकडे असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
कोपरगावात उद्धव ठाकरे शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेकडून गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा या लावण्यात आलेल्या एका बॅनरची जोरदार चर्चा आहे. ‘जो हाती घेईल मशाल त्याच्याच मस्तकी लागेल गुलाल” असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. कोपरगाव विधानसभेच्या राजकीय परिस्थितीवर लावलेले हे पोस्टर आहे. कोपरगावातील एसटी स्टँड परिसरातील रिक्षा संघटनेच्या या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. महायुतीचे तिकीट आपल्यालाच मिळणार असे म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी प्रचार सुरू केल्याने कोपरगावात रिक्षा संघटनेच्या त्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे विधानसभेच्या तोंडावर आहे. लावलेल्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. या बॅनरमुळे आता शहरासह तालुक्यातील कोपरगावकरांमध्ये राजकीय चर्चा रंगल्याचे पाहायला मिळतंय.
नक्की विवेक कोल्हे‘ काय करणार आहे?.. याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, येत्या डिसेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून विविध मतदारसंघांवर दावे प्रतीदावे सुरू झाले आहेत. अशातच आता विवेक कोल्हे यांनी देखील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. महायुतीत असल्यामुळे फार्मूल्याचा विचार करता कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने भाजपाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असलेले विवेक कोल्हे शरद पवार यांच्या गाडीत बसून गेले मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. तरीही विवेक कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना वेट अँड वॉच असं सल्ला देत उद्धव ठाकरे की शरद पवार यापैकी कुणीकडे याबाबत मात्र सध्या मौन पाळले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यात प्रचंड अस्वस्थता दिसून येत असल्याचे वृत्त तीनच दिवसांपूर्वी ‘दैनिक पुण्यनगरी’मध्ये प्रसिद्ध झाले होते . आणि आता अचानक रिक्षा संघटनेकडून सूचक आशयाचे बॅनर लागल्याने सध्या कोपरगाव तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. या बॅनरमुळे मैत्रिचा नवा अध्याय सुरू झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. यामुळे कोपरगाव विधानसभेचे राजकीय चित्र बदलणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.