कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा ही कोपरगावची लाईफ लाईन -विवेक कोल्हे
Kopargaon Taluka Auto Rickshaw is the life line of Kopargaon -Vivek Kolhe
सर्वांचे विघ्न दूर करून बळीराजा सुखीकर
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed11, Sep 20.00 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: व्यावसायांबरोबर सामाजिक आणि धार्मिक दायित्व जपणाऱ्या कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा संघटना ही कोपरगाव ची लाईफ लाईन म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे गौरवउद्गार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी सायंकाळी रिक्षा संघटनेच्या गणरायाच्या आरती प्रसंगी व्यक्त केले.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले व्यवसाय बरोबर गेल्या ३८ वर्षापासून रिक्षा संघटनेने गणेशोत्सव सुरू केला आहे या काळात मोठ मोठाले देखावे देखील त्यांनी सादर करून एक वेगळं आकर्षण निर्माण केला आहे. सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर कर आणि बळीराजाला सुखी कर अशी प्रार्थना देखील त्यांनी गणरायाला केली.व सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कोपरगाव शहरात कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने मंगळवारीच (दि १० सप्टेंबर) रोजी श्री गणरायाच्या आरतीचा मान युवानेते विवेक कोल्हे यांना देण्यात आला होता. यावेळी विवेक कोल्हे यांच्या हस्ते श्री गणरायाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात येऊन महाआरती करण्यात आली आहे.
यावेळी विवेक कोल्हे यांचा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. यावेळी रिक्षा संघटनेचे संस्थापक राजेंद्र झावरे, अध्यक्ष कैलास जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र चेअरमन पोपट झुरळे, मल्हारी देशमुख, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजप शहराध्यक्ष दत्ता काले, प्रकाश शेळके,पापा तांबोळी सुनील तांबट रवींद्र वाघ राजेंद्र कोपरे यांच्यासह कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी रिक्षा चालक मालक, शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.