‘धर्मवीर आनंद दिघे रिक्षा- टॅक्सी कल्याणकारी महामंडळा”चे सभासद व्हा. – अनंता जोशी
Become a member of Dharmaveer Anand Dighe Rickshaw-Taxi Welfare Corporation. – Ananta Joshi
श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात बैठक
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Fir13, Sep 17.20 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा अणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ” सभासद नोंदणीसाठी ऑटोरिक्षा परवाना धारकांनी श्रीरामपूर परिवहन कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन श्रीरामपूर उपप्रादेशिक अधिकारी अनंता जोशी यांनी केले.
शुक्रवारी (दि. १३)सप्टेंबर रोजी श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात सकाळी बारा वाजता कार्यालयीन सभागृहात ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ” सभासद नोंदणीबाबत ‘कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा – टॅक्सी संघटने’चे पदाधिकारी व संचालकांची बैठक श्रीरामपूर उपप्रादेशिक अधिकारी अनंता जोशी यांच्याअध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी माहिती देतांना श्री. अनंता जोशी म्हणाले, या मंडळाअंतर्गत प्रत्येक रिक्षा-टॅक्सीचालकाला जीवन विमा कवच तसेच कुटुंबीयांना मोफत वैद्याकीय उपचार दिले जाणार आहेत. अपघातात अचानक कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये आणि ज्या रिक्षा किंवा टॅक्सीचालकांच्या मुलांना शिकायचे असेल त्यांना शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल. त्यांच्या मुलांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल केले जाईल. तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. ६० वर्षांनंतर चालकांना निवृत्ती वेतन मिळणार,महिलांना प्रसुतीसाठी मदत केली जाणार आहे. चालकांसाठी वेगळे हॉस्पिटल असणार आहे. अशी माहिती त्यांनी या महामंडळाच्या सदस्यत्वची शुल्क आणि वार्षिक शुल्काची रक्कम ऑनलाइन भरणा करावयाचा असून ही शुल्क क्यूआर कोडद्वारा अथवा रोख स्वरूपात स्वीकारली जाणार नाही, सदर रकमेच्या भरणा हा महामंडळाच्या बँक खात्यात परस्पर जमाव होईल याची दक्षता घेण्यात यावी, बँक खात्याचा तपशील आपणास लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या,
‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा अणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळा”मध्ये सभासद नोंदणीबाबतचे कामकाज उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूरमार्फत सुरू करण्यात आले आहे.श्रीरामपूर आरटीओ परिवहन कार्यक्षेत्रातील सर्व ऑटोरिक्षा परवाना धारक, ऑटोरिक्षा / मीटर टॅक्स चालकांनी याची नोंद घेऊन महामंडळामध्ये नोंदणी करण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन श्रीरामपूरकार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी शेवटी केले आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मोटार वाहन निरीक्षक प्रवीण सर्जेराव, कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा- टॅक्सी संघटनेचे संस्थापक राजेंद्र झावरे, अध्यक्ष कैलास जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र सालकर, मल्हारी देशमुख, भाऊसाहेब जाधव, अनिल वाघ, राजेंद्र कोपरे, पापा तांबोळी, रवींद्र वाघ, राजेंद्र नावाडकर, सुनील कु-हे, सुनील देसाई आदी पदाधिकारी हजर होते.
यावेळी श्रीरामपूर येथील टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष सुनील मुथ्था व त्यांचे सर्व पदाधिकारी हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोटर वाहन निरीक्षक प्रवीण सर्जेराव यांनी केले, तर शेवटी आभार रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष पत्रकार राजेंद्र सालकर यांनी मानले.
Post Views:
56