कोपरगाव शहराच्या पाण्याचा प्रश्न आशुतोषने सोडविला याचा अभिमान -अशोक काळे
Proud that Ashutosh solved the water problem of Kopargaon city -Ashok Kale
कोपरगाव ची तहान भागवावी ही माझी देखील प्रामाणिक इच्छा होती
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sat14, Sep 20.20 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव शहराच्या गंभीर पिण्याच्या पाणी प्रश्नाची दाहता दाहकता मी अनुभवली आहे त्यासाठी मी माझ्या काळात प्रामाणिक संघर्ष देखील केला परंतु विरोधी आमदार असल्यामुळे अपेक्षित यश न मिळाल्याने ते राहूनच गेले होते. अशी प्रामाणिक खंत व्यक्त करताना माझा तो प्रश्न आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून सोडविला याचे मला निश्चित समाधान आहे. त्याबद्दल आशुतोष याचा मला अभिमान आहे असे गौरवउद्गार माजी आमदार अशोक काळे यांनी पाच नंबर साठवण तलावाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.
ते म्हणाले की, माझ्या कार्यकाळात ४ नंबर साठवण तलावाचा गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन कोटीचा निधी मंजूर करून कोपरगाव नगरपरिषदेला दिला होता. परंतु कोपरगाव नगरपरिषदेकडून तो निधी वापरला गेला नाही त्यामुळे त्यावेळी ४ नंबर साठवण तलावाचे काम होवू शकले नाही. कदाचित ते काम झाले असते तर परिस्थिती थोडीशी बरी असती. कोपरगाव शहराच्या नागरिकांची तहान भागावी हि माझी देखील प्रमाणिक इच्छा होती.
अशोक काळे पुढे म्हणाले आशुतोषने देखील सातत्याने हा पाणी प्रश्न उचलून धरला. धरणे आंदोलन व वेळप्रसंगी आमरण उपोषण देखील केले.त्यावेळी आपला मुलगा उपाशी असतांना ते तीन दिवस एका पित्याची काय अवस्था होते हि परिस्थिती मी अनुभवली असून माझ्या आयुष्यातील ते दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नांसाठी आशुतोष याची चाललेली धडपड पाहून मन कासावीस होत होते. कोपरगावची जनता त्याच्याबरोबर असल्याचे पाहून दिलासाही मिळत होता अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आल्याचे पाहून खूप बरे वाटते आहे.
२०१९ च्या निवडणुकीत कोपरगावकरांनी साथ दिली त्यामुळे कोपरगावकरांच्या आशीर्वादाने अशक्य प्राय असलेल्या कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून दाखविला ते पाहता यापुढील काळातही त्याला अशीच साथ द्या असे आवाहन करताना कोपरगावचा एकही प्रश्न आशुतोष शिल्लक ठेवणार नाही याची मी ग्वाही देतो असे मा.आ. अशोक काळे यांनी शेवटी म्हटले आहे.