लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचे नातवाच्या उपस्थितीत अनावरण
Inauguration of the memorial of the democratic Annabhau Sathe in the presence of the grandson
पालिकेकडून मात्र अधिकृत दुजोरा नाही
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Tue1, Sep.19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने तीन-चार वर्षांपूर्वी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी त्यांचे नातू सचिन साठे यांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण होणार आहे. अध्यक्षस्थानी आ. आशुतोष काळे असणार आहेत अशी माहिती माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी मंगळवारी (दि.१) रोजी दुपारी गौतम बँक सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. मात्र पालिका प्रशासनाकडून कालपर्यंत याला दुजोरा देण्यात आलेला नव्हता.
कोपरगाव शहरातील समाज बांधवांकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी मागणी होती, त्याप्रमाणे तात्कालीन नगराध्यक्षा सौ. सुरेखा राक्षेंच्या काळातच पुतळा झाला होता. परंतु त्याला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. असा आरोप वहाडणे यांनी केला. श्रेयवादाच्या स्पर्धेत तब्बल बारा वर्षे हा पुतळा गोडाऊन मध्ये होता. शिल्पकाराशी मी बोलल्यानंतर त्याने संरक्षणाची हमी मागितली आपण त्याला हमी दिल्यानंतर हा पुतळा कोपरगावात आला. त्यावेळी या पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. ज्यांनी विरोध केला त्यांनी स्मारकाच्या अवतीभवती फ्लेक्स लावले एवढ्यावर न थांबता ते सुद्धा या मिरवणुकीत सामील झाले होते असा अशी टीका देखील वहाडणे यांनी केली. सर्वजण साठेप्रेमी आहेत मग विरोध कशासाठी ? तेंव्हा सर्व मतभेद विसरून जल्लोषात सात तारखेला होणाऱ्या आनंदोत्सवात सामील व्हा, असे आव्हानच वहाडण यांनी केले. गालबोट लावलं तर समाज कधीही माफ करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेसाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, विरेन बोरावके, मेहमूद सय्यद, अजिज शेख, रमेश गवळी सुनील शिलेदार, स्वप्निल निखाडे, राजेंद्र वाकचौरे, तूपसौंदर सर, फकीर मामू कुरेशी, सागर लकारे, चंद्रशेखर म्हस्के, कांबळे, राजेंद्र खैरनार आदिसह पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक माजी नगरसेवक वीरेन बोरावके यांनी केले
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे ७ ऑक्टोबरला अनावरण हा शासकीय नगरपालिकेचा कार्यक्रम आहे का ?
या प्रश्नावर वहाडणे यांनी हा शासकीय कार्यक्रम असल्याचे सांगितले, परंतु मुख्याधिकारी सुहास जगताप यांची भेट घेतली असं त्यांनी या गोष्टीला अधिकृत दुजोरा दिला नाही, मात्र त्यांनी मला याबाबत आमदार साहेबांचे आजच पत्र आले असल्याचे सांगितले, परंतु याबाबत मला पालकमंत्री आणि इतर यांच्याशी चर्चा करावी लागेल असे उत्तर देऊन विषय थांबवला.