खरीप हंगामाची विमा रक्कम तातडीने शेतकऱ्यांना दया – सौ स्नेहलता कोल्हे

खरीप हंगामाची विमा रक्कम तातडीने शेतकऱ्यांना दया – सौ स्नेहलता कोल्हे

वृत्तवेध ऑनलाईन।2Augast 2020,
By: Rajendra Salkar,16:56

कोपरगाव : सन २०१९ -२० च्या खरीप हंगामातील कापुस व तुर या पिकाच्या विम्याची रक्कम शेतक-यांना तातडीने अदा करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आ. सौ स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचेकडे केली आहे.

सन २०१९ -२० मधील खरीप हंगामाती कापुस व तुर या पिकांची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आलेली होती, परंतू वेळेवर पाउस पडला नाही, तसेच खराब हवामान आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठया प्रमाणात खर्च करून उभी केलेली हातातोंडाशी आलेली दोन्हीही पिके वाया गेली, त्यामुळे शेतक-यांना मोठया आर्थीक नुकसानीस सामोरे जावे लागले. तत्कालीन सरकारच्या माध्यमातून दोन्ही पिकांचा भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत विमा उतरविण्यात आला होता, त्या विम्याची रक्कम शेतक-यांना अदा करण्याची मागणी सौ. कोल्हे यांनी केली.

सध्या जगासह देशभरात कोरोनाच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून महाराष्ट्रातही या आजाराने थैमान घातले आहे. मोठया कालावधीसाठी लाॅकडाउन करण्यात आल्याने शेतक-यांपुढे मोठे आर्थीक संकट उभे राहिले, विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशा परिस्थितीत त्यांना सन २०१९-२० च्या खरीप हंगामातील कापुस व तुर  पिकाच्या विम्याची रक्कम मिळाल्यास दिलासा मिळेल, त्यामुळे सदरच्या भारतीय कृषी विमा कंपनीनीकडून तातडीने विम्याची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याची मागणीही सौ. कोल्हे यांनी केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page