नेवासा तालुक्यात आठ व्यक्तींना कोरोनाची लागण
वृत्तवेध ऑनलाईन।2Augast 2020,
By: Rajendra Salkar,17:16
नेवासा : येथील कोविड केअर सेंटरमध्ये रविवारी रॅपिड अँटिजेन टेस्टच्या अहवालात तालुक्यातील चार गावांमधील ८ व्यक्ती करोना बाधीत आढळून आले असल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली आहे.
दरम्यान नेवासा येथील कोविड केअर सेंटर येथे ८८ व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये नेवासा शहरातील तीन ,, जैनपूर येथील तीन, तसेच मुकींदपूर व तरवडी येथे प्रत्येकी एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ८० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार सुराणा यांनी दिली.





