कोपरगाव मतदार संघात रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार – आ. आशुतोष काळे           

कोपरगाव मतदार संघात रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार – आ. आशुतोष काळे

Priority will be given to employment creation in Kopargaon Constituency – Mr. Ashutosh Kale

आशुतोष काळे यांच्या प्रचाराला वेग Ashutosh Kale’s campaign is speeding up

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat9, Nov.9.20 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव: मतदारसंघात पुरेसा रोजगार नसल्यामुळे अनेक तरुण रोजगारासाठी बाहेर आहेत. मतदारसंघातील कोपरगाव औद्योगिक वसाहतींत तरुणांच्या हाताला काम मिळेल, एवढे मोठे उद्योग अद्याप उभारले गेलेले नाहीत. त्यामुळे कितीही शिकले तरी कामासाठी बाहेर गेल्याशिवाय पर्याय रहात नाही. यासाठी  याकडे गांभीर्याने लक्ष देवून विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी या प्रश्नाकडे आपण प्राधान्यक्रमाने पाहत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगीतले.

मूलभूत प्रश्न व्यतिरिक्त आपल्या दृष्टीने कोपरगाव मतदार संघात प्रखरतेने ऐरणीवर  कोणता प्रश्न  असून आपण येणाऱ्या काळात कोणत्या प्रश्नाला प्राधान्य देणार ? असा प्रश्न विचारला असता त्यावर आशुतोष काळे यांनी रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

आ आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघात  कोपरगाव शहरासह तालुक्यातील एकूण ८९ गावांचा समावेश आहे पाच जिल्हा परिषद गट आणि दहा गणांचा समावेश आहे.गेल्या पाच वर्षात मी मतदारसंघात सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला गेला. बऱ्यापैकी विकासही झाला त्याचे तर समाधान आहेच, मात्र, अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कोपरगाव तालुक्यातील उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था असल्याने कोपरगाव मतदार संघ  हा ‘शैक्षणिक हब’ म्हणता येईल येथे गावोगावी शिक्षणाची सोय झाल्याने अनेक तरुण उच्चशिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. मात्र, त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे बेकारांची जणू फौजच निर्माण होत असल्याचे चित्र आहे. हजारो बेरोजगार युवक व्यसनाधीन बनत चालल्याचे चित्र बदलावे लागणार आहे.मतदारसंघात पुरेसा रोजगार नसल्यामुळे अनेक तरुण रोजगारासाठी बाहेर आहेत. मतदारसंघातील औद्योगिक वसाहतींत तरुणांच्या हाताला काम मिळेल, एवढे मोठे उद्योग अद्याप उभारले गेलेले नाहीत. त्यामुळे कितीही शिकले तरी कामासाठी बाहेर गेल्याशिवाय पर्याय रहात नाही.  याकडे आपण गांभीर्याने बघतो आहे. येणाऱ्या काळात याकडे लक्ष देवून विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. शासनाने मंजूर केलेली व होऊ घातलेल्या सोनेवाडी सावळीविहीर या नव्या एमआयडीसी  बरोबरच कोपरगाव रेल्वे स्टेशन रस्त्यावर असलेल्या वळू माता सेंटर व कुक्कुटपालन या शेकडो एकर जागेत आणखी एक नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. 

कोपरगावात औद्योगिक वसाहत आहे. मात्र, या ठिकाणी बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा एकही मोठा उद्योग नाही. रस्ते, वीज व मुबलक पाणी यांसारख्या सुविधा असूनही उद्योजक का फिरकत नाहीत? याबाबत विचार होणे गरजेचे आहे. शिकून हाताला काम नसल्याने नैराश्यातून तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली त्यामुळेच आपण या रोजगार निर्मितीच्या प्रश्नाला प्राधान्य देत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page