कोपरगांवात राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’ची टिकटिक थांबविण्यासाठी  विरोधात  ‘मशाल’च हवी 

कोपरगांवात राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’ची टिकटिक थांबविण्यासाठी  विरोधात  ‘मशाल’च हवी

To stop the ticking of NCP’s ‘clock’ in Kopargaon, we need a ‘torch’ against it.

राजेंद्र झावरे यांना उमेदवारी दिल्यास कोपरगावात इतिहास घडणार

25 वर्षाने पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Wed 23, Oct.19.20 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा असो की लोकसभा गेल्या 40 वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या या कोपरगाव मतदार संघाने पाच वेळा खासदार चार वेळा आमदार दिलेला आहे याचे एकमेव कारण म्हणजे नगर जिल्ह्यात सर्वात जास्त ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद एक गठ्ठा ताकद कोपरगाव मतदार संघात दिसून येते काळे कोल्हे या प्रस्थापितांना टक्कर देत येथील शिवसैनिकांनी शिवसेनेचा हा गड कायम राखला आहे राखला आहे आजपर्यंत केवळ पक्षाला ‘एक आमदार एक खासदार’ द्यायचा या निष्ठेने पेटून उठलेल्या शिवसैनिकांनी पक्षाने आयात केलेल्या  आमदार व खासदाराला प्रामाणिकपणे मोठ्या मताधिक्याने निवडून दिले परंतु प्रत्येकाने आपली पोळी भाजून शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून दिले हा इतिहास आहे परंतु तरीही शिवसैनिकांनी कधी हार मानली नाही आजही तो ताठ मानेने आणि ताठकण्याने निवडणुकीसाठी उभा आहे. परंतु आज कोपरगावात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक बंद करायची असेल तर शिवसेनेची मशाल पेटलीच पाहिजे.

यंदाची विधानसभा निवडणूक ही काहीशी आगळी वेगळी ठरणारी असेल. या निवडणुकीत पहिल्यांदाच काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत.राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वेगळेच राजकीय समीकरण तयार झालं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एक गट भाजपसोबत सत्तेत आणि दुसरा गट काँग्रेससोबत विरोधी पक्षात असल्याचं दिसून आलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या दुसऱ्या गटाला अनुक्रमे तुतारी आणि मशाल चिन्ह मिळालं. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच मशाल’ हे नवीन चिन्ह मिळाले. नव्या चिन्हासोबत लोकसभेला विजय मिळवून शिवसेनेने आपला गड कायम राखला आहे लोकसभेच्या माध्यमातून अतिशय कठीण परिस्थितीमध्ये कमी वेळात  येथील निष्ठावान शिवसैनिकांनी मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवले आहे आता हेच मशाल चिन्ह घेऊन विधानसभा  निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. महायुतीमुळे विद्यमान आमदार अशितोष काळे यांना उमेदवारी मिळणार असल्याने महायुतीत असलेले दिग्गज कोल्हे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने त्यांनी शिवसेनेत येण्याची तयारी दाखविली होती. केवळ उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी एक एक आमदार महत्त्वाचा ही गोष्ट लक्षात ठेवून शिवसैनिकांनी सुद्धा त्याला होकार दिला होता परंतु  राज्यासह केंद्रीय भाजपाच्या नेत्यांना कोल्हे यांना बंडखोरी करण्यापासून रोखण्याबरोबर भाजपमध्येच थांबविण्यात  यश आले दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी  अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली ती त्यांच्या विरोधात  ‘मशाल’ पेटणार  याची  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा सह संपर्क प्रमुख एक निष्ठावान शिवसैनिक राजेंद्र झावरे यांच्या नावावर सर्वानुमते शिक्का मोर्तब झाले असून केवळ औपचारिकता म्हणून मातोश्रीच्या आदेशाची अर्थात एबी फॉर्मची ते वाट पाहत असल्याचे  समजते.  

महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला ज्या जागा संदर्भात तिढा आहे त्या  तिढा  असलेल्या  २० जागेमध्ये कोपरगाव विधानसभेचे सुद्धा नाव आहे. 

राष्ट्रवादी पक्षाचा कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कुठलाही प्रभाव नाही असे असताना केवळ तिकीट मिळण्याचा अट्टाहास  केला जात आहे तसेच झाल्यास ही जागा बिनबोभाट अजित पवार गटाच्या पारड्यात पडेल परंतु जर ही जागा उद्धव ठाकरे शिवसेनेने घेतली आणि निष्ठावान शिवसैनिक राजेंद्र झावरे यांना उमेदवारी दिली तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात 2002 च्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकीत काळे कोल्हे या प्रस्थापितांना शह देत शिवसेनेचा निष्ठावान शिवसैनिक राजेंद्र झावरे हे नगराध्यक्ष झाले होते यावेळी स्वतः उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य रिक्षाचालक निष्ठावान शिवसैनिक म्हणून राजेंद्र झावरे यांना  उमेदवारी देऊन  विश्वास दाखविला होता तो विश्वास काळे कोल्हे यांच्याशी निकराची झुंज देत येथील शिवसैनिकांनी व राजेंद्र झावरे यांनी सार्थ करून येथील प्रस्थापितांविरोधात इतिहास घडविला होता आजही  राजेंद्र झावरे यांनी नगराध्यक्ष कारकिर्दीत केलेला छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा, असो संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ही व्यापारी संकुल, नेहरू भाजीपाला मार्केट, गोदावरी नदीवरील लहानपुल, स्वर्गीय सूर्यभान पाटील वहाडणे घाट, भारतातील एकमेव असलेले गुरु शुक्राचार्य मंदिराला पौराणिक दर्जा मिळवून दिला नाशिक सिंहस्थ मेळाव्याच्या कालावधीत कोपरगाव गोदावरी नदी येथे स्नानाची व्यवस्था करून कोपरगावच्या दक्षिणकाशी या नावाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला  साई संस्थान कडून पालखी रस्ता तयार करून घेतला सरकारी दवाखान्याचे नूतनीकरण केले नगरपालिकेच्या शाळेचे लोकवर्गणीतून रूप पालटून शाळेला एक वेगळी शिस्त देऊन शाळेची पटसंख्या वाढविण्यास हातभार लावला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासकीय जयंतीला सार्वजनिक रूप देऊन मोठ्या एक उत्सवाचे स्वरूप दिले  अशी कोपरगावकरांच्या कायम स्मरणात राहणारी अशक्य विकास कामे करून  प्रश्न सोडवून  सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा सामान्य माणूस म्हणून आपला ठसा उमटविला होता  तात्कालीन नेत्यांचा प्रचंड विरोध असतानाही ही कामे केली आजही कोपरगावातील प्रत्येक नागरिक त्यांच्या या कामाचे कौतुक करताना दिसतात आज पुन्हा विधानसभेच्या निमित्ताने एक निष्ठावान सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची संधी निर्माण झालेली आहे योगायोग यावेळी उमेदवारी देण्याचे सर्व अधिकार माननीय उद्धव ठाकरे यांना आहेत आणि आज एकमताने राजेंद्र झावरे यांच्या नावावर शिवसैनिकांनी शिक्कामोर्तब केले आहे त्यामुळ 25 वर्षांनी पुन्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजेंद्र झावरे यांच्यावर विश्वास टाकून राजेंद्र झावरे यांना उमेदवारी देऊन त्यांच्या हातात मशाल द्यावी यासाठी शेकडो शिवसैनिक पदर मोड करून उद्धव ठाकरे यांच्याकडे  जागा आणि उमेदवारी मागण्यासाठी मातोश्री वर पोहोचले आहेत  स्वर्गीय  हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की  तुम्ही याला त्याला माझ्याकडे कशाला आणता तुम्ही स्वतःच एखादा शिवसैनिक का उभा करत नाही आज पुन्हा एकदा साखर सम्राट सहकार सम्राट यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना टक्कर देण्यासाठी राजेंद्र झावरे नावाचा शिवसैनिक उभा ठाकला आहे आता त्यांच्या नावाचा विचार झाल्यास ही जागा शिवसेनेला मिळणार यात वादच नाही उद्धव ठाकरे आणि राजेंद्र झावरे असा पुन्हा एकदा 25 वर्षाने योग आला आहे कोपरगाव शहरात पुन्हा एकदा विधानसभेच्या रुपाने इतिहास घडेल. सामान्य शिवसैनिकाला आमदार खासदार मंत्री करण्याची किमया केवळ शिवसेनाच करू शकते असे खुद्द शरद पवार यांनी देखील कबूल केले आहे आजही तीच वेळ आली आहे

ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळाल्यास  ३५ ते ४० वर्षात पहिल्यांदाच निष्ठावान शिवसैनिकाला उमेदवारी मिळणार  आहे

एकंदरीतच यंदाची निवडणूक ही विविध कारणाने महत्त्वाची ठरणार आहे. आज पर्यंत कोपरगाव म्हटले की काळे कोल्हे यांची राजकीय लढाई संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी व महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय ठरणारी होती. मात्र यंदा कोल्हे यांनी माघारी घेतल्यामुळे कोपरगाव ची ही निवडणूक उद्धव ठाकरे शिवसेनेसाठी संधी देणारी भरली आहे  या शिवसेनेच्या उमेदवारीचे दूरगामी पडसाद  उमटणार असून याचे परिणाम आगामी काळात कोपरगावच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीत देखील पाहायला मिळतील.  यंदाच्या कोपरगाव विधानसभा निवडणुकीत  कोल्हे थांबणार हे जवळपास निश्चितच झाले आहे. त्यामुळे आठवड्यापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला,

आज या जागेसाठी  राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जरी दावा केला जात असेल तर तो केवळ काळे यांना बाय देण्यासाठीच असेल कारण गेल्या तीन निवडणुकीतील इतिहास पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा केला असताना त्या उमेदवाराचे सातत्याने डिपॉझिट जप्त झाले आहे अवघे अडीच तीन हजार मताच्या पुढे त्याला मत देखील पडलेले नाहीत त्यापेक्षा अपक्षांना ज्यादा मध्ये पडलेले आहेत केवळ काळे यांनी उमेदवारी घेतली म्हणून ते निवडून आले ती राष्ट्रवादीची मते नाहीत अन्यथा राष्ट्रवादी म्हणून इथे शून्य आहे  गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास पाहता शिवसेनेने सातत्याने आमदार खासदार निवडून आणली आहेत कोपरगाव मतदार संघात ज्याला आमदार खासदार व्हायचे त्याला शिवसेनेचे तिकीट घ्यावे लागेल असे समीकरणच बनवून टाकले होते आणि ते सत्यही आहे आजपर्यंत पाच खासदार आणि चार आमदार देऊन शिवसेनेने सिद्ध करून दाखवले आहे जेव्हा प्रस्थापित नसताना सुद्धा शिवसेनेकांनी कोल्हे असो की काळे असो या प्रस्थापितांना शिवसेनेच्या उमेदवाराने काटे की टक्कर दिलेली आहे आजही निष्ठावान शिवसैनिकांची नगर जिल्ह्यात सर्वात भक्कम अशी फळी कोपरगाव मध्ये आहे त्यामुळे  ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडणे म्हणजे जागा गमावणे असून महाविकास आघाडीची राजकीय आत्महत्या ठरेल त्यापेक्षा ही जागा शिवसेनेने लढविल्यास  काटे की टक्कर देऊन प्रस्थापितांना शह देत इतिहास घडेल 

कोल्हे यांच्या थांबण्याच्या चर्चेमुळे संपूर्ण कोपरगाव मतदार संघ ढवळून निघाला आहे.  कोपरगाव मतदार संघातील सामान्य नागरिक, महिला, मतदार, व्यापारी, शेतकरी कोल्हे समर्थक कार्यकर्ते यांच्यासाठी  हा मोठा धक्का मानला जात आहे. कोल्हे यांचे निवडणुकीतील लढाईचे महत्व किती मोठे आहे. यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही   निवडणुकीत कोल्हे नसणे याची  खंत मतदार संघातील सामान्य पासून  राजकीय जाणकारापर्यंत सर्वांच्या बोलण्यातून दिसून येते.  कोल्हे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्यावर अन्याय केल्याची भावना कोपरगाव मतदार संघातील प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. यामुळे कोल्हे यांच्यावर झालेल्या अन्यायाचे व  कोल्हे समर्थकांच्या नाराजीचे पडसाद नक्कीच येत्या विधानसभेत उमटणाऱ्या यात शंकाच नाही. अर्थात याचा लाभ कुणाला होणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही 

Leave a Reply

You cannot copy content of this page