राज्यातील पहिल्या दहा आमदारात येण्यासाठी आशुतोष काळेंना मताधिक्याने निवडून द्या  – ह.भ.प. लोहाटे महाराज

राज्यातील पहिल्या दहा आमदारात येण्यासाठी आशुतोष काळेंना मताधिक्याने निवडून द्या  – ह.भ.प. लोहाटे महाराज

Elect Ashutosh Kale to be among the top ten MLAs in the state – H.B.P. Lohate Maharaj

जास्त निधी आणणारा आमदार आशुतोष काळेच कोपरगावकरांना विश्वास- चैताली काळेIt is MLA Ashutosh Kale who brings more funds that the people of Kopargaon trust- Chaitali Kale

गजानन नगर चैताली काळे यांची कॉर्नर सभाIt is MLA Ashutosh Kale who brings more funds that the people of Kopargaon trust- Chaitali Kale

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun10, Nov.19.00 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव: मागील पाच वर्षात मतदार संघातील नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण केल्याने होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आ. आशुतोष काळेंना  मिळणाऱ्या मताधिक्याचा विचार करता ते राज्यातील पहिल्या दहा आमदारात असतील अशी अपेक्षा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व ह.भ.प. गणपत महाराज लोहाटे यांनी व्यक्त केली.

कीर्तन सेवेच्या माध्यमातून जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्याच्या विविध भागात नेहमीच जाणे येणे असते. त्यामुळे प्रत्येक भागातील विकासाचे अनेक प्रश्न सुटले असल्याचे दिसुन येत आहे व त्याबाबत नागरिकांकडून देखील प्रतिक्रिया येतात. कोपरगाव शहराचा अमुलाग्र विकास आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून या पाच वर्षात झालेला आहे. नागरिकांना विकासाच्या अपेक्षा असतात या अपेक्षा पूर्ण करण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहे. त्यामुळे त्यांना होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळणारच आहे. परंतु त्यांचे मताधिक्य एवढे असावे की, सर्वात जास्त मतांनी निवडून येणाऱ्या पहिल्या दहा आमदारांमध्ये आ.आशुतोष काळे असतील एवढ्या मताधिक्याने त्यांना निवडून द्यावे अशी अपेक्षा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व ह.भ.प. गणपत महाराज लोहाटे यांनी व्यक्त केली. 

कोपरगाव शहरातील गजानन नगर भागात महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ह.भ.प. गणपत महाराज लोहाटे बोलत होते.ते पुढे म्हणाले की, सर्व कार्यकर्ते एकदिलाने मनापासून काम करीत असून आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते निवडून येणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे.परंतु राज्याच्या निवडून येणाऱ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणाऱ्या पहिल्या दहा आमदारांमध्ये ते असले पाहिजे एवढे आ.आशुतोष काळे यांना मताधिक्य देण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी सौ.चैताली काळे म्हणाल्या की,मतदार संघातील सर्वच घटकांसाठी आ.आशुतोष काळे यांनी मोठे काम केले आहे. जीवघेण्या कोविड महामारीत एका कुटुंब प्रमुखाची जबाबदारी समर्थपणे पार पाडतांना शासनाच्या मदतीची वाट न पाहता मतदार संघातील जनतेचा जीव वाचविण्यासाठी जवळपास पाचशे ते सहाशे बेडचे कोविड केअर सेंटर उभारले. स्वत: जीवाची परवा न करता आरोग्य विभागाला सर्वोतोपरी मदत करत असतांना त्यांना स्वत:ला देखील दोन वेळेस कोविडची लागण झाली मात्र आपले कर्तव्य बजावण्यात ते मागे राहिले नाही. ज्याप्रमाणे महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविण्यासाठी त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करून पाच नंबर साठवण तलावाची निर्मिती केली.त्याचप्रमाणे ज्या महिलांनी जीवघेण्या कोविड महामारीत आपले सौभाग्य गमविले त्या माता भगिनींना आपला तीन महिन्याचा पगार देवून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. मतदार संघातील व कोपरगाव शहराचा झालेला विकास जनतेसमोर आहे. त्यामुळे भविष्यात विकासाबरोबरच कोपरगाव शहराचे अनेक विकास कामे आ.आशुतोष काळे यांना सोडवायचे आहेत. त्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या ते शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणतील याचा माझ्याबरोबरच कोपरगावकरांना देखील विश्वास असल्याचे सौ.चैताली काळे यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page