कोपरगावच्या पाण्यासह विकासाचे प्रश्न आ.आशुतोष काळेंनी सोडविले :-हाजी मेहमूद सय्यद
Kopargaon’s water and development problems were solved by Mr. Ashutosh Kale :- Haji Mehmood Syed
आमदार आशुतोष काळे यांची टाकळी नाका कॉर्नर सभाTakli Naka corner meeting of MLA Ashutosh Kale
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun10, Nov.19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :- मतदार संघासाठी झिजणारा आणि जनतेचे प्रश्न पोटतिडकीने सोडविणारा व सर्व सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता आ.आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगाव मतदार संघाला मिळाला आहे. त्यांनी पाच वर्षापूर्वी दिलेल्या वचनांची पूर्तता करून जनतेच्या अपेक्षेपेक्षा जास्त विकास करून दाखविला असून कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्यासह मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न पाच वर्षात आ.आशुतोष काळे यांनी सोडविले असल्याचे माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद यांनी म्हटले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात आ.आशुतोष काळे यांच्या प्रचाराने वेग घेतला असून ग्रामीण भागासह कोपरगाव शहरात देखील कॉर्नर सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ०८ मधील टाकळी नाका येथे शनिवार (दि.०९) रोजी आ. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कॉर्नर सभेत माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, कोपरगाव शहराला महिन्यातून दोन वेळेला पिण्याचे पाणी येत होते. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची एवढी भीषण टंचाई निर्माण झाली की, कोपरगाव शहरातील नागरिकांना २० ते २८ दिवसांनी पाणी यायला लागले.दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत जावून कोपरगाव शहराची पाणी प्रश्नाबाबत अतिशय अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना पाणी साचवून ठेवण्यावाचून पर्यायच नव्हता व त्यासाठी प्रत्येक नागरिकांच्या दारासमोर पाण्याच्या टाक्या नित्याच्या झाल्या होत्या.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आ.आशुतोष काळे यांनी पहिला शब्द दिला होता की, मी आमदार झाल्यावर सर्वात प्रथम कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवून दाखवेल आणि त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे पाणी प्रश्न सोडवून दाखवला आहे. पाण्याच्या टाक्या दूर करण्याचे काम व कोपरगाव शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी देण्याचे काम आ. आशुतोष काळे नावाच्या आधुनिक भगीरथाने केले आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरवून पुण्याचे काम करणाऱ्याआ.आशुतोष काळे यांचा संपूर्ण कोपरगावकरांना अभिमान आहे. शहराचा पाणी प्रश्नाबरोबरच शेतीचा पाणी प्रश्न असेल किंवा मतदार संघाचे विकासाचे प्रश्न असतील हे प्रश्न या पाच वर्षात त्यांनी मार्गी लावले आहे. त्यांना कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाबरोबरच इतरही प्रश्नांची अचूक जान आहे.कोपरगाव शहरातील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी व्यापारी संकुल उभारले जात आहे. शहरातील रस्त्यांचा विकास झाला आहे. शहराचे अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे कोपरगाव शहर लवकरच विकासाच्या बाबतीत शेजारील विकसित शहरांशी स्पर्धा करणार याचा माझ्यासह कोपरगाव मतदार संघातील जनतेला विश्वास आहे.त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करणारे आ.आशुतोष काळे यांना मतदार संघातील सुज्ञ मतदार भरभरून मतदान करणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद यांनी यावेळी व्यक्त केला.