आर्थीक विकास साधण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करणार – आ.आशुतोष काळे
Will make effective efforts to achieve economic development – A.Ashutosh Kale
कोपरगाव :- कोपरगाव मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुलभूत विकासाचे रस्ते, वीज, पाणी, आरोग्याचे प्रश्न सोडविले आहे. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याची घेतलेली जबाबदारी पाच नंबर साठवण तलाव पूर्ण करून पार पाडली असून नागरिकांना दर तीन दिवसाआड पाणी मिळत आहे. भविष्यात दर दिवसा-आड किवा दररोज पाणी उपलब्ध होईल. मतदार संघाबरोबर कोपरगाव शहर देखील विकासाच्या वाटेवर आणण्यात जनतेच्या आशीर्वादाने यशस्वी झालो आहे. यापुढील काळात विकासाच्या प्रश्न सोडविण्याबरोबरच मतदारसंघातील सर्व सामान्य कुटुंबांचा आर्थीक विकास साधण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करणार अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरातील शंकरनगर, हनुमान नगर व गांधीनगर आदी ठिकाणी रविवार (दि.१७) रोजी आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत नागरिकांशी संवाद साधतांना आ.आशुतोष काळे बोलत होते. या ठिकाणी घेण्यात आलेल्या या सभांना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी सांगितले की, कोपरगाव शहराचा मिटलेला पाणी प्रश्न, रस्त्यांसह सर्व बाबतीत विकास झाल्यामुळे कोपरगाव शहराची बाजारपेठ पुन्हा फुलली असली तरी मला हि आर्थिक उलाढाल अजून वाढवायची आहे. त्यासाठी आपल्या तालुक्याच्या सीमेवर होणाऱ्या एमआयडीसीत लवकरात लवकर नवीन उद्योग आणून मतदार संघातील बेरोजगारांना रोजगार देवून त्यांच्या कुटुंबांची आर्थिक प्रगती मला साधायची आहे. कोपरगाव शहरालगत नवीन एमआयडीसी उभारायची आहे. त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कोपरगावची बाजारपेठ फुलणार असून विकास चक्रासोबत अर्थचक्र देखील अधिक वेगाने फिरणार आहे. मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने विकासाचे विविध प्रश्न मार्गी लागले आहे. गोदावरी कालव्याच्या दुरुस्ती साठी निधी मिळवून लाभधारक शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला असून पुढील काळात दुरुस्तीसाठी अधिकचा निधी आणणार आहे. निळवंडे चाऱ्यांच्या कामाला गती देवून वितरिका लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आणायचे आहे. गोदावरी खोऱ्याच्या पाण्याची कमी झालेली तुट भरून काढण्यासाठी अजितदादांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पश्चिमेचे पाणी पुर्वेला वळविणेसाठी प्राधान्यक्रम देणार आहे. केटी वेअरचे बॅरीजेस कम पुलाध्ये रुपांतर करून दळणवळणाला अधिक गती देणे, उजनी उपसा सिंचन योजनेप्रमाणे पालखेड डाव्या कालव्यातून पाणी उचलण्यासाठी उपसा सिंचन योजना सुरु करणे, कोपरगाव शहरात भूमिगत गटारी, भूमिगत वीज वाहिन्या व सिमेंट कॉक्रीटचे रस्त्यांची निर्मिती करून कोपरगाव शहरात अद्यावत सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुलाची उभारायचे आहे. दक्षिण-उत्तर रस्त्याच्या निर्मितीबरोबर विकासाची उर्वरित कामे पूर्ण करून कोपरगावला विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात नंबर एक करायचे आहे.
कोपरगाव मतदार संघाचा झालेला विकास आणि माझ्या विकासाच्या संकल्पना माझे मार्गदर्शक तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या साक्षीने मतदार संघातील जनतेला सांगितले आहे. आणि त्या विकासाच्या संकल्पना सत्यात उतरविण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतेलेली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे २०१९ ची विधानसभा निवडणूक संपताच मी मतदार संघाच्या विकासाचा श्री गणेशा पहिल्या दोनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाचे भूमीपूजन करून केले होते. त्याचीच पुनरावृत्ती हि निवडणूक आटोपताच करणार आहे त्यामुळे निश्चितच मतदार संघाच्या विकासाला वेग येईल. रस्ते वीज पाणी आरोग्य या प्रश्नावर अधिक भर देऊन मुलभूत गरजा पूर्ण झाल्या आहेत. पुढील काळात उर्वरित विकास कामांना लवकरात लवकर प्रारंभ करून विकासाचे सर्वच प्रश्न निकाली काढणार आहे. मतदार संघातील राहाता तालुक्यातील ११ गावांना विविध विकास कामांच्या माध्यमातून निधी देवून त्या गावांना देखील विकासाच्या वाटेवर आणले आहे. मतदार संघातील जनतेने मला २०१९ ला आशीर्वाद दिला व यावेळी देखील देणार आहे याचा मला विश्वास असून हा आशीर्वाद मोठ्या मताधिक्याने द्या यापुढील काळातही मतदार संघाच्या झालेल्या विकासापेक्षा भविष्यात अधिकचा विकास करेल अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यावेळी दिली.