२१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण- नि. नि. अधिकारी  सायली सोळंके

२१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण- नि. नि. अधिकारी  सायली सोळंके

Preparations for voting in 219 Kopargaon Assembly constituency complete – N.N . Officer Sayali Solanke

२७२ मतदान केंद्रे;  २०५  जणांचे  गृहमतदान झाले, तर १६१८ टपाली मतदान,सहा आदर्श मतदान केंद्र

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!,Tue19 Nov 5.00 Pm.By  सालकर राजेंद्र 
कोपरगाव. विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली. प्रशासनाकडून २१९ कोपरगाव विधानसभा संघात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदार संघात एका जागेसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत. तर.  दोन लाख ८९ हजार ६५६  मतदार आहेत.प्रशासनाकडून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. मतदारांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडून मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावावा असे   आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी  केले.     
मतदान साहित्याची तपासणी करताना मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी
२१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील २७२ मतदान केंद्रावर मतदान होणार असून २ लाख ८९ हजार ६५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी टेबल संख्या – साहित्य वितरणासाठी २६ टेबलवर १५६ अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती वाहन संख्या – २७ बसेस व  २१ स्कूल बस ७ जीप मधून मतदान केंद्रावर पथके पोहचणार
मतदान कर्मचारी संख्या – १२०० मतदान कर्मचारी ,सुरक्षा‌‌ कर्मचारी – सुमारे ३५० पोलीस कर्मचारी व ३५० केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल (CAPF) कर्मचारी प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन सहाय्यक अधिकारी, दोन पोलिस कर्मचारी असे १ हजार ९०० महसूल कर्मचारी पोलीस आणि राखीव कर्मचाऱ्यासह  होमगार्ड २८ विभागीय अधिकारी व त्यांचे २८ सहाय्यक सात अति शीघ्र प्रतिसाद पथके आहे एकूण ९४ वाहने मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहेत यात २७ बस २१ एक क्रुझर व इतर वाहने आहेत  मतदार संघात एकूण सहा आदर्श पिंक मतदान केंद्र आहेत यात युवक युवती महिला दिव्यांगांचे प्रत्येकी एक एक व वेगवेगळ्या थीम घेऊन तीन केंद्रांचा समावेश आहे सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या  पटांगणावर सर्व तयारी असून १९ नोव्हेंबरला दुपारी बारानंतर कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर रवाना केले जातील, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.

मतदान केंद्राकडे रवाना होताना जेवण करताना अधिकारी व कर्मचारी
यावेळी बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके म्हणाले एकूण दोन लाख ८९ हजार ६५६ मतदारांमध्ये १,४६, ३३७ पुरुष, १,४३,३१३ मतदार आहेत .ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधव ६६ गृहमतदानासाठी २९८ मतदारांपैकी ८५ वयापेक्षा जास्त वय असलेले १८४ ज्येष्ठ नागरिक व इतर ३४ उमेदवार आहेत. त्यातील २०५ मतदारांनी त्याचा लाभ घेतला. मतदारसंघात १६१८ टपाली मतदान असून १०० टक्के मतदारांना ते पाठवले आहेत.
मतदार संघात एकूण सहा आदर्श पिंक मतदान केंद्र आहेत यात युवक युवती महिला दिव्यांगांचे प्रत्येकी एक एक व वेगवेगळ्या थीम घेऊन तीन केंद्रांचा समावेश आहे.यात मॉडेल मतदान केंद्र १०३ कोपरगाव नवीन मंडळ अधिकारी कार्यालय पश्चिम इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक एक मॉडेल मतदान केंद्र १०४ कोपरगाव  अभिलेख तालुका भूमी अभिलेख कार्यालय, कोपरगाव महिला कर्मचारी संचलित मतदान केंद्र १२६ कोपरगाव नगरपालिका दवाखान्यात जवळ स्वर्गीय नामदेवराव परजणे विधी महाविद्यालय कोपरगाव दक्षिणे उत्तर इमारत उत्तरेकडील खोली क्रमांक चार,  दिव्यांग कर्मचारी संचलित (पीडब्ल्यूडी) मतदान केंद्र २०७ डाऊच खुर्द  गावठाण जिल्हा परिषद शाळा पूर्व पश्चिम इमारत पश्चिमेकडील खोली क्रमांक एक,  युवक कर्मचारी संचलित युथ मतदान केंद्र १२८ कोपरगाव डॉ. सी एम मेहता कन्या विद्या मंदिर,कोपरगाव नवीन उत्तर दक्षिण इमारत उत्तरेकडील खोली क्रमांक पाच, निगेटिव्ह मतदान केंद्र (निरंक), पर्दानशीन मतदान केंद्र  १०८ कोपरगाव नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार दक्षिण उत्तर इमारत उत्तरेकडील खोली क्रमांक चार मतदान केंद्र तयार केले आहेत.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके, यांनी दिली
प्रत्येक मतदाराला बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदानादिनी आधारकार्ड, मतदानकार्ड, बँकेचे पासबुक, पॅनकार्ड असे शासनमान्य १२ पुरावे सोबत घेऊन मतदान करावे लागणार आहे. येथील सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल येथे २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. अशी माहिती सहाय्यक  निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांनी दिली. या कामी त्यांना नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, मनीषा कुलकर्णी राजू शेख चंद्रशेखर कुलथे यांनी मदत केली

Leave a Reply

You cannot copy content of this page