एक दृष्टिक्षेप!  २१९ कोपरगाव विधानसभा मतदार संघाची मतदानाची अंतिम टक्केवारी नंतर, 

एक दृष्टिक्षेप!  २१९ कोपरगाव विधानसभा मतदार संघाची मतदानाची अंतिम टक्केवारी नंतर,

At a glance! Final voting percentage of 219 Kopargaon assembly constituency after,

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Fir22 Nov 9.30 Am.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव  : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली आहे. यामध्ये २१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील १२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटी मध्ये बंद झाले अर्थात ईव्हीएम मध्ये लॉक झाले आहे. दरम्यान, दिवसभरात कोपरगाव मतदारसंघात एकुण ७१.४९% मतदान पार पडले आहे.आता सर्वांचेच लक्ष २३ नोव्हेंबरला निकालाकडे लागले आहे. किती मताधिक्य मिळणार? याची उत्सुकता आता सर्वसामान्यांमध्ये दिसून येत आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये २ लाख ८९ हजार ६५६ मतदारांपैकी एकूण २ लाख ७ हजार ०७७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये एकूण पुरुष १ लाख ७ हजार ३९४ मतदारांनी तर   ९९ हजार ६७९ महिला मतदारांनी तर इतर ४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. २०२४ साली होत झालेल्या या विधानसभा निवडणुकीत एकूण ७१.४९% मतदान संपन्न झाले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात प्रमुख लढत ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादी अशी असली तरी  अजित पवार राष्ट्रवादी काळे आमदार काळे विरुद्ध उबाटा शिवसेना अशीच लढत बघायला मिळाली आहे. आमदार काळे गटाने आपली प्रचार मोहीम राबवताना अतिशय काटेकोर नियोजन केले होते; तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेनेमुळे व शिवसैनिकामुळे  यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बऱ्यापैकी लढत  बघायला मिळाली होती.

राज्यामध्ये असलेल्या महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना राबविली होती. त्याचा परिणाम संपूर्ण राज्यामध्ये बघायला मिळाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागांमध्ये महिला मतदारांनी उस्फुर्तपणे मतदान केले असल्याचे बघायला मिळाले आहे. यामध्ये अगदी महिलांच्या लाबंच लांब रांगा लागल्या असल्याचे सुद्धा बघायला मिळाले आहे. आज झालेल्या मतदानामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान अवघे ७३९८ इतकेच कमी आहे.

कोपरगाव विधानसभा निवडणुकीचा विचार करता ही निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला होता.  इतरही पक्ष   या निवडणुकीत असून त्यांची भूमिका नगण्य अशी ठरली आहे. दुसरीकडे पहिल्यांदाच प्रस्थापित काळे विरुद्ध कोल्हे पारंपारिक  अशी लढाई झाली नाही याउलट या निवडणुकीत काळे, कोल्हे, परजणे,  औताडे, रोहमारे, जाधव व वहाडणे  असे सर्वच दिग्गज महायुतीच्या अर्थात आ. काळे यांच्या एकच बाजूला होते. त्यामुळे या निवडणुकीत काळे यांना बलाबला चा विचार करता तसे तगडे आव्हान नव्हते याशिवाय आ. आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात यश मिळवले आहे त्या निधीतून केलेला विकास, शहराचा सोडविलेला पाणी प्रश्न जातीनिहाय समाजाला दिलेला निधी, कार्यकर्त्यांची मोठी फौज सातत्याने ठेवलेला जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे  आ. काळे यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री तर आहेच, प्रश्न आहे तो अजित पवार यांनी शब्द दिल्यामुळे मंत्रिपदाची डोहाळे लागलेल्या काळेंना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा आहे.

 मतदार संघाचा आढावा घेतल्यानंतर कोल्हे यांनी थांबण्याचा निर्णय घेतल्यानंतर हिरमोड झालेल्या कार्यकर्त्यात काहीशी नाराजी असली तरी अजित पवार यांच्या कोपरगाव येथील जाहीर सभेनंतर कोल्हे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी झटून केलेल्या प्रामाणिक कामामुळे आ. आशुतोष काळे यांच्या मोठ्या मताधिक्याची अपेक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता दिसत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

 कोपरगाव मतदार संघाचा विचार करता या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार संदीप वर्पे यांच्यात सरळ लढत होत आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांची ताकद तशी या मतदारसंघात नगण्य आहे. परंतु मित्र पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेची ताकद या ठिकाणी बऱ्यापैकी असल्याने यावेळेस वर्पे यांच्या  मागे शिवसेना व  भक्कमपणे उभे राहिलेले शिवसैनिक यामुळे त्यांनी बऱ्यापैकी आ. काळे समोर दखल घेण्यासारखे आव्हान उभे प्रयत्न केला आहे. शरद पवार यांची सभा व संदीप वर्पे यांचा  जनसंपर्क आणि वकृत्व यातून थेट काळे यांच्यावर केलेला आरोपांचा सरळ सरळ हल्ला यामुळे बऱ्यापैकी त्यांनी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात काही अंशी यश मिळवल्याचे दिसते तर दुसरीकडे कॉर्नर सभा रॅली या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून निवडणुकीत काही प्रमाणात रंगत आणली निवडणुकीत इतर उमेदवार असले तरीही आ. काळे व संदीप वर्पे यांच्यात सरळ सामना होत असल्याने  काळे यांच्यावरील नाराज मते, कोल्हे कडील नाराज मते, एक गठ्ठा अल्पसंख्यांकांची मते, उद्धव ठाकरे शिवसेनेची मते, महायुती बद्दल शेतकरी वर्गात असलेली नाराजी ही गोळाबेरीज  आपल्या जमेची बाजू असल्याची खात्री वर्पे यांना असल्यामुळे निवडणूक घासून होईल अशी त्यांना अपेक्षा आहे.

 दोन लाख सात हजार मतदान झाले असल्यामुळे २०१९  विधानसभेचा विचार करता टक्केवारीत ५ % ची घसरण झाली आहे. मात्र मागच्या विधानसभेच्या तुलनेत साडेचार हजाराने मतदान वाढले आहे आ आशुतोष काळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तरीही नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या तुलनेत कालच्या विधानसभेला ३६ हजार मतदान वाढले आहे. वाढलेले मतदान म्हणजे प्रशासन सोशल मीडिया यामुळे झालेली मतदार  जनजागृती म्हणावी की?  ध्रुवीकरणाविरोधात मतदान?  म्हणावे यामागील  तर्क वितर्क काही असला तरी   मतदान  वाढल्यामुळे नक्की कोणत्या उमेदवाराला तारक ठरणार आहे तर कोणत्या उमेदवाराला मारक ठरणार आहे ?मतदान जादा झालेले आहे या मतांचा विचार करता जनता कुणाला झुकतं माप देणार? की कुणाचे गणित बिघडविणार? आजपर्यंत झालेल्या सर्वच निवडणुका मध्ये सरळ सरळ व  कायम  काळे कोल्हे यांच्यात लढाई झाल्यामुळे दोन गटातील ही लढाई आरोप प्रत्यारोप, दावे प्रति दावे अशी थेट जे काही घडायचे ते निवडणुकीच्या पटावर सरळ सरळ दिसत असे, त्यामुळे लढाईचे चित्र काय असेल याचा बऱ्यापैकी अंदाज येत असे, परंतु आत्ताची निवडणूक म्हणजे ज्यांच्यातून कधी निवडणूक म्हटले की विस्तवही जात नाही असे निवडणुकीत विळ्या  भोपळ्याचे नाते असलेले सुद्धा एकत्र आले,यात काळे यांच्याबरोबर कोल्हे परजणे,औताडे, रोहमारे, जाधव,वहाडणे, या दिग्गजांमुळे वरवर एकतर्फी  दिसत असणारी ही निवडणूक ! दरवेळी उघड उघड जाहीरपणे बोलणारा मतदार यावेळी अबोला धरून होता, मतदारांच्या मनात नेमके काय चालले ? याचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे  ही निवडणूक  सरळ लढतीपेक्षा अंतर्गत लढाईची आधिक  म्हणावी लागेल.  विशेष म्हणजे या निवडणुकीत झालेली काळे कोल्हे यांची युती मतदारांना भावली आहे का? या ही  प्रश्नाचेही उत्तर मिळणार आहे.आजवर केलेल्या सामाजिक कामाची पावती म्हणून मतदारांनी आपल्याला स्वीकारले असून आपणही विजयी होत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे .

म्हणूनच या अर्थानेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार करता सर्वच दृष्टीने ही निवडणूक अगदीच वेगळी आहे. याबाबत निश्चित आराखडे बांधणे धाडसाचे होईल. असे असले तरीही आ. आशुतोष काळे हेच विजयी होतील. यात शंका नाही, मात्र आमदार काळे यांना मोठे मताधिक्य मिळणार का ?ही निवडणूक अगदी अटीतटीची घासून होणार का ?   या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं २३ नोव्हेंबरला (निवडणुकीचा निकालात) मिळणार आहेत.याचे चित्र शनिवारी, दि. २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page