कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी ७१• ४९ टक्के मतदान
71•49 percent voting for Kopargaon assembly constituency
टक्केवारी घटली तरी मतात साडेचार हजाराची वाढ Despite the percentage decrease, the number of votes increased by 4,500
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Wed20 Nov 10.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: २१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी (७१.४९%) मतदान शांततेत पार पडले यात पुरुष एक लाख ७ हजार ३९४ व महिला९९६७९ तर इतर चार असे एकूण दोन लाख ७ हजार ०७७ इतके मतदान झाले. असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके व सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत यांनी दिली
गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चालू असलेल्या नेत्यांच्या प्रचारतोफा सोमवारी (१८ नोव्हेंबर) थंडावल्या होत्या. आज २० नोव्हेंबरला (बुधवारी) पार पडले आहे. सकाळच्या टप्प्यात मतदानाला अल्पसा प्रतिसाद मिळत होता परंतु टप्प्याटप्प्याने मतदानाचा टक्का वाढत गेला सायंकाळी सहा वाजेनंतर बऱ्याच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या रात्री उशिरा मतदानाची आकडेवारी मिळाली
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण २०२५४० (७६.३८%) इतके मतदान झाले होते.२०२४ विधानसभा निवडणुकीत एकूण दोन लाख ७ हजार ०७७ (७१.४९%) इतके मतदान झाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे (४•८९%) टक्के मतदान कमी झाले असले तरी मतदान मात्र ४५३७ मतांनी वाढले आहे
बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली परंतु थंडी असल्याने पहिल्या टप्प्यात अल्पसा प्रतिसाद मिळत होता नंतर सातत्याने त्यात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीत लढत होत आहे. पहिल्या चार तासात सकाळी ११ वाजेपर्यंत (२१.१%) मतदान झाले आहे यात पुरुष ३६२५८ तर महिला २५००१ व इतर एक असे एकूण ६१२६० इतके मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत (३६.९६ %) मतदान झाले होते. एकूण मतदान एक लाख ७ हजार ५१ यात पुरुष ५८ हजार ३८० तर महिला ४८ हजार ६७० यांनी मतदानाचा हक्क बजावला होता दुपारी तीन वाजेपर्यंत (५२•३९.%) मतदान झाले आहे यात पुरुष ७८६७९ तर महिला ७३०५७ व इतर २ असे एकूण १५१७३८ इतके मतदान झाले होते.सायंकाळी पाच वाजेपर्यंत (६५•८०%) मतदान झाले आहे यात पुरुष ९७४२३ तर महिला ९३१६२ व इतर ३ असे एकूण १९०५८८ इतके मतदान झाले होते. शेवटच्या टप्प्यात सहा वाजेपर्यंत (७१•४९%) मतदान झाले आहे यात पुरुष एक लाख ७३९४ व महिला ९९ हजार ६७९ तर इतर ४ असे एकूण दोन लाख ७ हजार ०७७ इतके मतदान झाले आहे
२१९ कोपरगांव विधानसभा मतदार संघातील २७२ मतदान केंद्रावरुन मतदान प्रक्रिया पुर्ण करुन परतणारे मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी, पोलीस शिपाई यांचे गुलाब पुष्प गुच्छ देवून स्वागत करतांना निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंकी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत,प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक सागर देशमुख, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, कोपरगांवचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी स्वागत केले…
२१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदान केंद्रावरील साहित्य संकलनाचे काम कोपरगाव येथील सेवा निकेतन स्कूल येथे सुरू आहे या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भेट देऊन पाहणी केली…
२१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके, सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे २७२ मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही तसेच कुठल्याही ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना घडली नाही तसेच ईव्हीएम मशीन बाबत कुठलीही तक्रार आली नाही संपूर्ण विधानसभा मतदार संघात मतदान शांततेत पार पडले या कामी तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी व शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या चोख बंदोबस्तामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. याचबरोबर मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कर्तव्यदक्षता बाळगल्याने कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतदान सुरळीत व शांततेत पार पडले.
ही निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. इतरही लहान पक्ष या निवडणुकीत असून त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असली तरी मविआ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे. या निवडणुकीत काय होणार? मतदान किती टक्के होणार? जनता कुणाला झुकतं माप देणार? या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं २३ नोव्हेंबरला (निवडणुकीचा निकालात) मिळणार आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल. यावेळी मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळे प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळालं हे बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी असलेल्या रांगातून स्पष्ट झाले आहे
Post Views:
35