बचत गटाच्या महिलांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठीच गोदाकाठ महोत्सव- सौ चैताली काळे0

बचत गटाच्या महिलांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठीच गोदाकाठ महोत्सव- सौ चैताली काळे

Godakath Festival is held to provide a proper market to the women of self-help groups – Mrs. Chaitali Kale

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Tue14 Jan 25  17.00 pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: संधी मिळाली तर महिला देखील संधीचे सोने करू शकतात याचा विश्वास असल्यामुळे बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून द्यावी या उद्देशातून गोदाकाठ महोत्सव सुरु करण्यात आला. असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी दिले

 
मा.आ.अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्याने प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदाकाठ महोत्सव सुरु करण्यात आला. असेही त्या म्हणाल्या

गोदाकाठ महोत्सव महिला बचत गटाच्या चळवळीला चालना देण्याचे काम इमाने इतबारे पार पाडीत असल्याचे सौ.पुष्पाताई काळे यांनी म्हटले आहे.
बचत गटांच्या महिलांनी घरगुती तयार केलेल्या मालाची अनेक दुकाने थाटली आहे. यामध्ये गृह उपयोगी वस्तु, मसाले, पापड, लोणची, शोभेच्या वस्तू, खाद्य पदार्थांचे विविध प्रकार ग्राहकांच्या पसंतीला उतरल्याने  गोदाकाठ महोत्सवाची तीन दिवसात लाखोंची उलाढाल पाहता जवळपास दीड कोटीच्या वर उलाढाल होणार असल्याचा अंदाज  व्यक्त होत आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारा व्यवसाय त्यामुळे गोदाकाठ सुरु होण्यापूर्वीच दोन महिने अगोदर सर्व स्टॉल्स  बुक झालेले असतात.  ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देवून त्यांची आर्थिक ताकद वाढविण्याचा, ग्रामीण संस्कृतीचे दर्शनघडविणारा ‘गोदाकाठ महोत्सव’ केंद्रबिंदू बनला असल्याचे चैताली काळे यांनी सांगितले .

Leave a Reply

You cannot copy content of this page