गोदावरी दूध संघाच्या सुवर्ण महोत्सवी  सोहळ्याला राज्यपाल बागडे उपस्थित राहणार आहेत. 

गोदावरी दूध संघाच्या सुवर्ण महोत्सवी  सोहळ्याला राज्यपाल बागडे उपस्थित राहणार आहेत.

Governor Bagde will be present at the Golden Jubilee Celebrations of Godavari Milk Association.

२५ कोटींच्या कामाचा शुभारंभ

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Thu 16 Jan 25  19.20 pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघ हजारो लोकांना रोजगार देते सोमवारी २० जानेवारी रोजी या दूध संघाचा ५० वा वर्धापन दिन गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर सकाळी १० वाजता साजरा होत आहे. यानिमित्त २५ कोटीच्या विविध  प्रकल्पांचा शुभारंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या शुभहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी राज्याचे जलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे राहणार आहेत अशी माहिती गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी गुरुवारी (१६) रोजी दुपारी पत्रकार परिषदेमध्ये दिली

कार्यक्रमाचे मान्यवर

 राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि राज्याचे जलमंत्री  नामदार राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाचे चेअरमन मिनेश शहा, वैजापूर आमदार रमेश प्रा. रमेश बोरनारे, नेवासा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, कोपरगाव आमदार आशुतोष काळे, संगमनेर आमदार अमोल खताळ, पारनेर आमदार काशिनाथ दाते या  मान्यवरांच्या उपस्थितीत दीड मेगावॉट (डीसी) क्षमतेची सौर ऊर्जा प्रकल्प, मिल्क  क्लेरिफायर मशीन, कन्टयुन्युअस खवा मेकिंग मशीन पाणी शुद्धीकरण यंत्रणा, पाणी साठवण टॅंक व कर्मचारी निवास घरकुल बांधकाम पायाभरणी शुभारंभ आदी कार्यक्रम होणार असल्याचे राजेश परजणे यांनी सांगितले

कार्यक्रमासाठी मान्यवर आमदार व अधिकारी

राजेश परजणे पुढे म्हणाले, गोदावरी दूध संघ हा तालुक्यातील अग्रगण्य दूध संघ असून गेल्या ५० वर्षांमध्ये सातत्याने वेळोवेळी येणाऱ्या अडचणीवर मात करून या भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेती पूरक जोडधंदा म्हणून  आर्थिक कामधेनू ठरला आहे. ११ कोटीच्या दीड मेगावॉट (डीसी) क्षमतेच्या सौर उर्जेमुळे संघाच्या विजेच्या मोठा आर्थिक भार कमी झाला आहे यापासून संघाला लागणारी वीज वापरून उरलेली वीज नोव्हेंबर पासून वीज मंडळाला देत आहोत १ कोटी १० लाख किमतीच्या मिल्क क्लेरिफायर मशीन मुळे डोळ्यांना न दिसणारे केवळ सूक्ष्मदर्शकाद्वारे दिसणारे जंतू देखील यातून साफ होणार असल्याने जास्तीत जास्त निर्जंतुक दूध ग्राहकापर्यंत देण्यात येणार आहे तर स्वीडन येथून सुमारे ४ कोटी रुपये किमतीचे कंटयुन्यूशन खवा मशीन मुळे  तासाला २०० किलो खवा तयार करण्याची क्षमता असल्याने एकाच दर्जाचा खवा उपलब्ध होऊन ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पाहिजे तशा प्रकारचा लागेल तेवढा खवा देता येणार आहे त्याचप्रमाणे साडेतीन कोटी रुपये  खर्चाची पाणी शुद्धीकरण यंत्रणा  सुरू होत असून यातून तासी  ३० हजार लिटर पाणी शुद्ध होणार आहे त्यासाठी   १४ लाख लिटर क्षमतेचा पाणी साठवण टॅंक तसेच या ठिकाणी संघात कार्यरत असणारे कामगार अधिकारी यांच्यासाठी ४ कोटी रुपये  खर्चाची  इमारत बांधण्यात येणार असून वन बीएचके १६ व  टू बीएचके १६ अशी अत्याधुनिक घरे  बांधण्यात येणार  आहेत त्याचा पायाभरणी समारंभ देखील होणार आहे अशा सर्व सुमारे २५ कोटी कामांचा शुभारंभ होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. राज्यातील लोकप्रिय नेते आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे या भव्य प्रसंगी  उपस्थित राहतील ही बाब आमच्यासाठी अभिमानाची  आहे 

शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या  हितासाठी समर्पित असलेल्या गोदावरी दूध संघाने डेअरी क्षेत्रात क्रांती केली आहे. गोदावरी दूध संघ सातत्याने या क्षेत्रात कार्यरत आहे, योग्य प्रशिक्षण, चाऱ्यासाठी योग्य बियाणे, दूध खरेदी, बायफ नासिक यांच्यामार्फत कृत्रिम रेतन आणि पशुपालनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदान करत आहे. असेही त्यांनी सांगितले.

सध्या, गोदावरी संघाचा वार्षिक डेअरी उद्योग २७५  कोटींहून अधिक झाला आहे आणि गोदावरी सहकारी दूध संघ  अंतर्गत आज १ लाख ६० हजार दूध संकलन होत असून यातून दूध विक्रीसह दही, पनीर, मसाला दूध, खवा, लस्सी, मसाला ताक ,साधे ताक , पेढे ,आम्रखंड, श्रीखंड, यासारखे उपपदार्थ सुमारे ६८ लाख रुपयांची विक्री होते. त्या अनुषंगाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३० रुपये लिटर व २ रुपये प्रति लिटर वरकड असे ३२ रुपये प्रति लिटर याप्रमाणे  दूध उत्पादकांना दररोज ५१ लाख २० हजार रुपये इतके  दिले जातात. अशी माहिती राजेश परजणे यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page