सोनेवाडी तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठीच तंटा
Sonewadi dispute-free, dispute over the election of the president
गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी असलेल्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पदाचा वाद चांगला शिगेला पोहोचला आहे.
सोनेवाडीत गोंधळात गोंधळ अन्
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Sun 28 Jan 25 19.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी असलेल्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा वाद चांगलाच शिगेला पोहचला आहे. नजीकच्या सोनेवाडी येथील ग्रामसभेत विशेष बाब म्हणून तंटामुक्त समिती गठन करण्याचा विषय प्रकर्षाने होता. मात्र मतमतांतरे यामुळे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदावरूनच रस्सीखेच झाला.
बोलविण्यात आलेली विशेष सभा रद्द झाली.पुढील काळात विरभद्र बिरोबा मंदिर परिसरात विशेष ग्रामसभा घेऊन तंटामुक्त समिती गठित करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
मागील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे यांचा कार्यकाळ संपल्याने पुन्हा नव्याने तंटामुक्त समिती गठन करण्यासाठी विषय ग्राम विकास अधिकारी भानुदास दाभाडे यांनी घेतला.
सरपंच शकुंतला गुडघे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या सभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाकरिता दोन जणांची नावे पुढे आली
गेल्या आठ दिवसापासून जो तो आपल्या गटाचा अध्यक्ष होण्यासाठी प्रयत्न करत होता. तंटामुक्त समिती गठन करण्या अगोदरच अध्यक्षपदाची निवड होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.
यावेळी तर उपसरपंच संजय गुडघे, निरंजन गुडघे व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांचे समर्थक सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे कामकाज सुरु होताच समर्थकांनी आपला उमेदवार अध्यक्षपदावर नियुक्त व्हावा यासाठी चांगलाच गोंधळ घातला.
एका बाजूने काही नागरिकांनी हात वर करून अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी आग्रही भूमिका धरली . तर दुसऱ्या बाजूने गुप्त मतदान पद्धतीने अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या चिठ्ठ्या काढून अध्यक्ष निवडावा असे सांगण्यात आले. या दोन्ही भूमिकेचे एकमत न झाल्यामुळे सभेचे कामकाज तंटामुक्तऐवजी तंटायुक्त अध्यक्षाची तर निवड होत नाही ना, असा प्रश्न उपस्थितांना पडला आहे. परिणामी सभा गुंडाळण्यात आली. तर दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. गावात तंटे उदभवू नयेत, शांतता नांदावी, गावातील तंटे गावातच सोडविता यावेत, यासाठी तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात येते. परंतु या सभेच्या अध्यक्ष निवडीवरूनच सोनेवाडी उडालेला गोंधळ पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला होता. या सभेतील गोंधळाची नागरिक ठिकठिकाणी चर्चा करीत होते. पुढील काळात विरभद्र बिरोबा मंदिर परिसरात विशेष ग्रामसभा घेऊन तंटामुक्त समिती गठित करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.





