कोरोना : कोपरगावात सोमवारी ९७ चाचण्या २६ नव्या रुग्णांचा समावेश
वृत्तवेध ऑनलाईन।3Augast 2020,
By: Rajendra Salkar,15. 23
कोपरगाव : सोमवारी दुपारी ९७ जणांच्या नमुन्याची रॅपिड अॅण्टिजेन चाचणी केली. यात २६ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर ७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
२६ पॉझिटिव्ह रुग्णात : टिळेकर वस्ती १ ,संजीवनी १४ ,संजय नगर १ , सुभद्रा नगर १, बैलबाजार रोड २ ,येसगाव १, द्वारका नगर १, लक्ष्मी नगर १, टिळक नगर २, कोळपेवाडी १, इंदिरा पथ १ यांचा समावेश असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले, सोमवारी (३ ऑगस्ट) रोजी दुपारी कोपरगाव येथे ९७ जणांचे नमुने रॅपिड अॅण्टिजेन चाचणी द्वारे तपासण्यात आले यात २६ एक्टिव रुग्ण आढळून आले तर उर्वरित ७१ अहवाल निगेटिव्ह आले असे त्यांनी सांगितले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे.





