कोपरगाव संजीवनी येथील कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू,

कोपरगाव संजीवनी येथील कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू,

बिपीन कोल्हे यांनी दुःख व्यक्त केले.

वृत्तवेध ऑनलाईन।3Augast 2020,
By: Rajendra Salkar,17.03

कोपरगाव : संजीवनी कारखाना येथील एकाचा सोमवारी (३ ऑगस्ट) कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. संजीवनी साखर कारखाना येथील कामगार प्रकाश सस्ककर (४२) यांचा सोमवारी (३ ऑगस्ट) रोजी दुपारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ३१ जुलै रोजी त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांना नगर येथे स्थलांतरित करण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कारखान्यात वर्कशॉप मध्ये टर्नर म्हणून कार्यरत असलेल्या सस्ककर यांच्या मृत्यूबद्दल संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दुःख व्यक्त केले. कोपरगाव तालुक्यातील हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी लक्ष्मीनगर येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

You cannot copy content of this page