अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस आहे
Akshaya Tritiya is a very auspicious day in Hinduism
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 30 April 8.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस आहे जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभकार्य अक्षय किंवा अविनाशी मानले जाते,अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला पूजा करताना करा-केळीचा उपयोग केला जातो.

खास अक्षय तृतीयेसाठी तयार करण्यात येणाऱ्या करा-केळींचा बाजार कोपरगावला मुख्य रस्त्यावर, बँक रोड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरील भागात भरला होता. शहरातील तसेच बेट भागातील पारंपारिक कुंभार समाजातील कुटुंबीयांनी मातीपासून तयार केलेल्या या करा-वेळी बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ५०,८०,१००,१२० रुपये अशा किमतीत त्यांची विक्री झाली. हजारो रुपयांची उलाढाल त्यातून झाली.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाला हिंदू धर्मात महत्त्व असल्यामुळे मोठ्या श्रध्देने करा केळीचे विधीवत पूजाविधी केले जातात. मातीच्या भांड्यात आंबा, खरबूज टरबूज ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा असल्यामुळे दरवर्षी नव्या करा-केळीचा उपयोग पूजेसाठी केला .यासाठी लागणाऱ्या करा-केळी येथील कुंभार कुटुंबीय पंधरा ते वीस दिवस अगोदर करा-केळी तयार करण्याच्या कामाला लागतात. मातीत राख मिसळून एकजीव केलेल्या चिखलाला विजेच्या चाकावर ठेवून विविध आकारातील करा-केळी तयार करण्यात येतात. सुरुवातीला राखाडी रंगाच्या असलेल्या या करा-केळींना गेरू लावण्यात येत असल्यामुळे त्या लाल रंगाच्या होतात.
सध्या बाजारात तीन प्रकारच्या करा-केळी उपलब्ध आहेत. छोट्या, मध्यम आणि मोठ्या फॅन्सी आकारातील करा-केळी ५०,७०,८०,१००,१२० रुपये किमतीत विक्री केल्या आहेत. अक्षय तृतीया दिवशी करा केळीची मोठ्या प्रमाणात विक्री होऊन हजारो रुपयांची उलाढाल झाली.
Post Views:
157





