पाटबंधारे विभागाच्या  जागेत सर्व घटक समावेशक पुनर्विकास आराखडा  तयार करणार -आ. आशुतोष काळे 

पाटबंधारे विभागाच्या  जागेत सर्व घटक समावेशक पुनर्विकास आराखडा  तयार करणार -आ. आशुतोष काळे

Preparation of Comprehensive Redevelopment Plan for the site of the Dam Section. Ashutosh Kale

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Mon 26 May 14.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : पाटबंधारे विभागाच्या जागेत  एकाच कॅम्पस मध्ये  मुलांना खेळण्यासाठी बगीचा, तरुणांना रोजगारासाठी शॉपिंग सेंटर,  ज्येष्ठांसाठी जॉगिंग पार्क,अत्याधुनिक  सुख सुविधांनी युक्त असे‌ शासकीय अधिकाऱ्यांसाठी विश्राम गृह, अत्याधुनिक पाटबंधारे कार्यालय इमारत,   बांधण्याचा मनोदय असून अधिकाऱ्यांशी चर्चा करून या जागेचा  संपूर्ण पुनर्विकास  आराखडा तयार करणार असल्याचे  आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी (२६  मे रोजी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नाबार्ड पायाभूत विकास निधी अंतर्गत कोपरगाव शहरातील पाटबंधारे विभागाच्या जागेत अंदाजे सव्वा पाच कोटी  रुपये खर्चाचे,३ हजार  मॅट्रिक टन क्षमतेचे धान्य गोडाऊन बांधण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष  काळे पत्रकारांशी बोलत होते.

कार्यक्रमात तहसीलदार महेश सावंत, सब जेलर  चंद्रशेखर कुलथे, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,पाटबंधारे विभागाचे बसवराज शिंदे यासह विविध खात्याचे अधिकारी, काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  माजी नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना आमदार आशुतोष काळे   म्हणाले, कोपरगाव पाटबंधारे विभागाची अंदाजे साडेसात एकर जागा या ठिकाणी उपलब्ध आहे. या जागेत पुनर्विकास आराखडा  तयार करताना, सर्व घटक समाविष्ट करणे  आवश्यक आहे. यात, विद्यमान इमारती आणि जमिनीचा योग्य वापर, नवीन इमारती आणि सुविधा, वाहतूक व्यवस्था, आणि परिसरातील लोकांच्या गरजांचा समावेश करणे आवश्यक आहे. या दृष्टीने
कोपरगाव शहरात कुठेही लहान मुलांसाठी  चांगला बगीचा नाही त्यामुळे या ठिकाणी शहरातील लहान मुलांसाठी  संपूर्ण सुविधा असलेला  बगीचा तयार करण्यात येईल.  त्याचबरोबर नगर मनमाड महामार्ग व येवला नाका या भागातील  कमर्शियल व्हॅल्यू लक्षात घेऊन बेरोजगार तरुणांना   रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने   या ठिकाणी सुंदर असे व्यापारी संकुल  बांधण्यात येईल त्याचप्रमाणे ज्येष्ठांसाठी या ठिकाणी जॉगिंग पार्क सुद्धा करण्यात येणार आहे त्याचबरोबर पाटबंधारे  विभागाची अत्याधुनिक अशी कार्यालयीन इमारत व अत्याधुनिक असे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. यासाठी भूमिपूजन झालेली गोडाऊनची जागा प्रसंगी बदलण्यातही येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकाच परिसरात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे अनेक मार्ग आहेत. या परिसरात बिनकामाची उगवलेली झाडे बाजूला करून त्या ठिकाणी  मुलांसाठी बगीच्या , खरेदीसाठी दुकाने आणि ज्येष्ठांसाठी विरंगुळा, सामान्य नागरिकांसाठी मनोरंजनाचे पर्याय शासकीय  विश्रामगृह यांचा समावेश होऊ शकतो. विशेषतः या शहरी योजनांमध्ये, एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असतील तर लोकांना प्रवास कमी करावा लागतो आणि वेळ वाचतो. असेही आ. आशुतोष काळे म्हणाले,

Leave a Reply

You cannot copy content of this page