अपंगत्वावर मात, शिकण्याची जिद्द भारी; काका मला कलेक्टर व्हायचंय!

अपंगत्वावर मात, शिकण्याची जिद्द भारी; काका मला कलेक्टर व्हायचंय!

On disability, however, the persistence of learning is overwhelming; Uncle, I want to be a collector!

काका कोयटे परिवाराकडून अंजलीला मदतीचा हात

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sun 18 May 19.20 Pm.By  सालकर राजेंद्र
 

कोपरगाव : शहरातील कन्या महाविद्यालयातील अंजली निलेश चिखले या विद्यार्थ्यीनीने जिद्दीने अपंगत्वावर मात करून इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ८७.४० टक्के गुण मिळवले आहेत. त्याच्या या यशामुळे त्याच्या आई-वडिलांना विशेष आनंद झाला आहे.

अंजलीने आपल्या अपंगात्वावर मात करत ८७.४० टक्के मार्क  मिळविले याबद्दल समता उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे व सौ सुवासिनी कोयटे यांनी अंजलीच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. तिचे कौतुक करून तिचे  अभिनंदन केले. 

यावेळी काका कोयटे यांनी अंजली हिला विचारले की तुला पुढे काय करायचे ?  त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता अंजली म्हणाली,काका मला कलेक्टर व्हायचे आहे ! . तिचा निर्धार पाहून काका कोयटे यांनी तिला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.भविष्यात वैद्यकीय मदत, त्याचबरोबर शैक्षणिक मदत त्याचबरोबर इतर कुठलीही मदत लागल्यास आपण सदैव मदत देण्यास तयार असल्याचे ग्वाही कोयटे दांपत्याने अंजलीला दिली. कोयटे परिवाराने भूकंपाचे कोरोना असो पूर असो सातत्याने प्रत्येक क्षेत्रातील गरजूला मदतीचा हात दिलेला आहे  अंजनीला  मदतीचं आश्वासन देणाऱ्या कोयटे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंजली जन्म कोपरगाव पुणतांबा रस्त्यावरील चिखले वस्ती येथे झाला. जन्म झाल्या झाल्या ती पायाळू असल्याने तिची पायाची आढी होती. त्यावर उपचार सुरू असतानाच ती दोन-तीन महिन्याची असताना तिला निमोनिया झाला होता . त्यामुळे तिला अपंगत्व आले. अंजलीचे चांगले संगोपन करण्यावर तिच्या आई-वडिलांनी भर दिला. तिची आई रूपाली ही घरकाम करते. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याची तिची इच्छा असूनही अंजलीच्या जन्मानंतर तिचे संगोपन करण्यात वेळ जात असल्याने सतत तिचे करावे लागत असल्याने इच्छा असूनही अंजलीची आई रुपाली यांना बाहेर जाऊन मोलमजुरी करता येत नव्हती. अंजलीचे वडील निलेश पाभूनाथ चिखले हे शिर्डीला एका दुकानात सेल्समन चे काम करीत होते परंतु तेही काम त्यांचे सुटले आहे.  अंजलीला एक भाऊ असून तो आठवी शिकत आहे.
अंजलीवर सुरुवातीला लोणी येथे फिजोथेरीपी करण्यात येत होती परंतु रोज जाणे शक्य नसलेले दोन-तीन दिवसात ते जात होते त्यानंतर काही दिवस अंजलीला  विळद घाट नगर येथे फिजोथेरीपी करण्यात आली त्यानंतर काही दिवस पुणतांबा येथेही फिजिओथेरपी केली त्यानंतर कोपरगाव येथील एस जी एस दवाखान्यात फिजिओथेरपीची सोय झाल्याने तेथे ती उपचार घेत होती परंतु दहावीचे वर्ष असल्याने अभ्यासामुळे तिला वर्षभर एस जी एस हॉस्पिटलमध्ये उपचार थांबवावे लागले. अंजलीच्या आई-वडिलांनी ती बरी व्हावी यासाठी पुणा वगैरे अनेक ठिकाणी तपासणी केली परंतु प्रत्येक ठिकाणी शस्त्रक्रिया करू परंतु ती चालेल याची मात्र कोणीही  खात्री देत नसल्याने व अंजलीची प्रकृती अशक्त असल्याने आई-वडिलांनी ते धाडस केले नाही दहावीच्या परीक्षेच्या वेळी नेमके अंजलीला सर्दी पडसे व ताप आला होता अंजली लिखाण करू शकते परंतु लिखाणाचा वेग कमी असल्यामुळे तिला दहावीच्या परीक्षेसाठी रायटर मदतनीस घ्यावी लागली यावेळी मदतनीस म्हणून नववीच्या सेजल बोरसे हिने तिचे पेपर लिहिले अशी माहिती अंजलीने दिली.
अंजलीचे शिक्षण इयत्ता पहिली ते पाचवी कोकमठाण येथील थोरात वस्ती येथे झाले त्यानंतर   सहावी ते दहावी पर्यंतचे अंजलीचे शिक्षण कोपरगाव शहरातील सी.एम. मेहता कन्या विद्या मंदिर येथे झाले . शाळेत पहिलीपासून नववीपर्यंत अंजलीने स्वतः पेपर लिहिले मात्र दहावीला तिला मदतनीस घेऊन परीक्षा द्यावी लागली. शेजल बोरसे  हिने दहावीचे पेपर लेखन केले आहे. 
अंजलीला चित्रकला. कथालेखन व कविता लेखन यांची आवड आहे अंजलीने आत्तापर्यंत विद्यार्थी दशा. मैत्री. आणि स्पर्धा परीक्षेतील संघर्ष या तीन कथा लिहिलेल्या त्याचप्रमाणे निसर्ग. वातावरण. मैत्री. संघर्ष  अशा विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या  दोनशे कविता तिने लिहिलेल्या आहेत 
अक्षर चांगले असले तरी अंजलीला जास्त वेगाने लिखाण करता येत नाही आपण शाळेत शिकत असताना कन्या विद्या मंदिर मध्ये शिक्षकांचे आपल्याला वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन लाभले वर्ग दुसऱ्या मजल्यावर असल्याने कधी आई बरोबर घेऊन जायची तर कधी आईला उशीर झाला तर मैत्रिणी मला वर घेऊन वर्गात बसवायच्या व खाली घेऊन यायच्या असेही तिने सांगितले.  मी वाचलेले माझ्या चांगले लक्षात मला इतिहास भूगोल या विषयांची आवड आहे आणि विशेष म्हणजे या विषयात मला ९६ टक्के मार्क पडलेले आहेत. मला कुठलीही ट्युशन किंवा क्लासेस नव्हते त्यामुळे मी स्वतः  दररोज  पहाटे चार ला उठून सकाळी आठ वाजेपर्यंत अभ्यास करायचे त्यानंतर शाळा, शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी सात ते रात्री साडेअकरा अशी  दररोज साडेआठ तास अभ्यास घरी  करत होते असे अंजली यांनी सांगितले. आपले लक्ष समोर ठेवून मेहनत घेऊन  सातत्याने अभ्यास केला तर यश निश्चित मिळते असा संदेश तिने नववीच्या विद्यार्थ्यांना दिला आहे दहावीच्या परीक्षेसाठी मला के. बी .पी. विद्यालय हे केंद्र आले होते मला   सर्व विषयात ८७.४० टक्के गुण मिळाले आहेत.

चौकट 

अंजली चे मनोगत

अंजलीने आपल्याला कलेक्टर व्हायचे असे स्वप्न जोपासले असून ती सातत्यानं नववी पासूनच ती  युपीएससी परीक्षेचा सराव करीत आहे ती अकरावीला कला शाखेत प्रवेश घेणार असून बीए पदवी संपादन केल्यानंतर तिला यूपीएससी परीक्षा द्यावयाची आहे. घरापासून जवळ असलेल्या के.जे. सोमय्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचे तिने सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page