रिक्षा स्टॅन्ड चा श्वास पुन्हा मोकळा, ट्रॅक्टर भरून साहित्य केले जप्त

रिक्षा स्टॅन्ड चा श्वास पुन्हा मोकळा, ट्रॅक्टर भरून साहित्य केले जप्त

Rickshaw stand’s breath again free, tractor loaded with materials seized

फेरीवाले हात गाडीवाले यांना हॉकर्स नॉन हॉकर्स परवाने दया

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Wed 4Jun 18.30 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: पालिकाप्रशासने बुधवारी (४जुन) सकाळी बाजारपेठेतील विविध भागात संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. पहिल्याच दिवशी तब्बल तीन चार ट्रॅक्टर   साहित्य जप्त करण्यात आले. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  ही कारवाई करण्यात आल्याने संबंधितांची चांगलीच पळापळ झाली. रिक्षा स्टॅन्ड वरील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात  हटवण्यात आल्याने  रिक्षा स्टॅन्डने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला.

दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असून पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी   यांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले.
फेरीवाले, भाजीवाले, खाद्यपदार्थ चहाच्या टपऱ्या, तसेच दुकानांचे फलक भर रस्त्यात ठेवण्यात आलेल्या साहित्यामुळे बाजारपेठेचा श्वास कोंडला होता.

 या अतिक्रमणांमुळे बाजारपेठेत पायी चालणेही कठीण झाले होते.  यांनी पाच महिन्यांपूर्वी 22 व 23  फेब्रुवारीला संपूर्ण शहरात धडाकेबाज अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. मात्र, बाजारपेठेतील रस्ते पुन्हा एकदा जाम झाले होते.  त्यामुळे अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेचे नियोजन करून कारवाई केली

बुधवारी  सकाळी प्रत्यक्ष मोहीम राबवण्यात आली. मेन रोड, बँक रोड, धारणगाव रोड, रिक्षा स्टँड परिसर आदी भागात दिवसभर ही मोहीम सुरू होती. नपाचे  पंचवीस ते तीस  कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात जेसीबी ट्रॅक्टर या लावाजम्यांसह ही कारवाई करण्यात आली. पहिल्याच दिवशी तब्बल तीन ते चार ट्रॅक्टर साहित्य जप्त करण्यात आले. काही ठिकाणी दुकानांच्या पायऱ्या, पत्र्यांचे शेड ओट्यांचे पक्के अतिक्रमण जेसीबी मशीनने पाडण्यात आले. मोठ्या लवाजम्यासह कारवाई सुरू झाल्याने अतिक्रमणधारकांची चांगलीच पळापळ झाली. काही ठिकाणी नपाचे अधिकारी नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. परंतु  अतिक्रमणधारकांचा फारसा विरोध झाला नाही. अनेकांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढून घेतले. कारवाई पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अतिक्रमणधारकांनी नगपालिकेच्या या मोहिमेचा चांगला धसका घेतला आहे. अनेकांनी कारवाईपूर्वीच आपली अतिक्रमणे काढून घेतली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रिक्षा स्टॅन्ड व परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आल्याने रिक्षा स्टॅन्ड चा श्वास मोकळा झाला आहे. या कारवाईचे रिक्षा चालकांनी व शहरातील नागरिकांनी प्रशासनाच्या या कारवाईचे मनापासून स्वागत केले आहे.

नगरपालिकेने अतिक्रमण काढून रिक्षा स्टॅन्ड ची  जागा मोकळी केली आहे परंतु या जागी तातडीने ब्लॉक किंवा कॉंक्रिटीकरण करावे तसेच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे फ्लेक्स लावण्यात यावे येऊ नये, तसेच शिवाजी महाराज व व्यापारी संकुल समोर उभ्या  राहणाऱ्या रिक्षांना एसटी बस आगाराच्या  भिंतीलालगत असलेली  बंद पडलेली गटार बुजवून त्या ठिकाणी स्लॅब टाकून रिक्षासाठी जागा करून द्यावा अशी राजेंद्र साळकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे ही मागणी पूर्ण झाल्यास रस्त्यावरील रिक्षा सर्व आत मध्ये जातील रस्ता मोकळा होऊन वाहतुकीची कोंडी होणार नाही त्याचबरोबर रिक्षा चालकांना देखील बस स्टॅन्ड मधून येणाऱ्या प्रवाशांची सेवा करता येणार आहे. अशी देखील  मागणी रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष  राजेंद्र सालकर यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे केली आहे. शिवाजी महाराज व व्यापारी संकुल समोर उभ्या  राहणाऱ्या रिक्षांना एसटी बस आगाराच्या  भिंतीलालगत असलेली  बंद पडलेली गटार बुजवून त्या ठिकाणी स्लॅब टाकून रिक्षासाठी जागा करून द्यावा अशी राजेंद्र साळकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे ही मागणी पूर्ण झाल्यास रस्त्यावरील रिक्षा सर्व आत मध्ये जातील रस्ता मोकळा होऊन वाहतुकीची कोंडी होणार नाही त्याचबरोबर रिक्षा चालकांना देखील बस स्टॅन्ड मधून येणाऱ्या प्रवाशांची सेवा करता येणार आहे ते म्हणाले,

या अतिक्रमण मोहिमेत नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली  सुनील आरण, आरोग्य विभाग प्रशांत उपाध्ये , मार्केट विभाग, सतीश साबळे, मार्केट विभाग, प्रवीण पठाडे, नगररचना विभाग रमेश घोरपडे, मुकादम आरोग्य विभाग व अधिनस्त कर्मचारी यांच्यासह २५ ते ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सक्रिय भाग घेतला

चौकट

गावातील स्थानिक नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी हात गाडीवाले फेरीवाले यांना हॉकर्स नॉन हॉकर्स परवाने कसे मिळतील कायमस्वरूपी कायदेशीर धंदा कसा करता येईल. यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे उगाच आपल्याला त्यांचा कळवळा  असल्याचा आव आणून अतिक्रमण करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करू नये वारंवार त्यांचे नुकसान करू नये – एक सुज्ञ नागरिक

Leave a Reply

You cannot copy content of this page