आषाढी वारी ही शरीर शुद्धीकरणाबरोबर धार्मिक आणि अध्यात्मिक यात्रा- बिपीन कोल्हे
Ashadhi Wari is a religious and spiritual journey with body purification- Bipin Kolhe
“चला पंढरीला जाऊ । विठ्ठल डोळा भरून पाहू ॥ संत कैकाडी बाबा पालखी
Rajendara C. Salkar,
News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Wed 18Jun 10.30 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : सात्विक अन्न मिळावे यासाठी ज्याप्रमाणे पूर्वी भांड्याला कल्हई करून वर्षभर त्याचा वापर केला जात असे तद्वत वार्षिक यात्रा असलेली आषाढी वारी ही केवळ शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया नाही. ती एक धार्मिक आणि आध्यात्मिक यात्रा आहे, ज्यात वारकरी पंढरपूरला पायी जातात. या यात्रेदरम्यान शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी कैकडी महाराज यात्रेच्या स्वागतप्रसंगी केले. पंढरपूरला पायी चालत जातात. या यात्रेचा मुख्य उद्देश भगवान विठ्ठलाचे दर्शन घेणे आणि त्याच्या भक्तीत तल्लीन होणे हा आहे. असेही ते म्हणाले,

सोमवारी १७ जुन रोजी कोपरगाव येथे दरवर्षीप्रमाणे सायंकाळी आठ वाजता पालखीचे आगमन झाले
“चला पंढरीला जाऊ । विठ्ठल डोळा भरून पाहू ॥
श्री संत राजाराम महाराज उर्फ संत कैकाडीबाबा, सच्चिदानंद संत साईबाबा, ह.भ.प. कोंडीराम काका व गुरूवर्य ह.भ.प. रामदास (शिवराज) महाराज या संत महात्म्यांचा विश्वात्मक स्नेहभाव पालखी सोहळा, मनमाड (आनंदपुरी) ते संत भुमी तिर्थक्षेत्र पंढरपूर (वैकुंठभुमी) पालखीचे आगमन झाले.या पालखी सोहळ्या बरोबर स्वतः ह.भ.प. भारत (शिवदास) महाराज जाधव आहेत.

गेल्या ३२ वर्षापासून नारायण शेठ अग्रवाल परिवाराने या पालखीचे स्वागत करून कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी मुक्कामाची व जेवण व निवासाची व्यवस्था करतात त्यांच्या निवासस्थानी आरती व भजन केले जाते यानंतर गावातील सर्व स्तरातील लोकांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

या कार्यक्रमासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे कैकडी महाराज पालखीचे सर्वेसर्वा ह भ प .भारत (शिवदास) जाधव महाराज, तहसीलदार महेश सावंत ,शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ,नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड ,अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, प्रसिद्ध बिल्डर्स माधवराव देशमुख, प्रसिद्ध बिल्डर्स प्रसाद नाईक, उद्योजक कैलासशेठ ठोळे, हृदयरोग तज्ञ डॉ.संकेत मुळे, उद्योजक मनोज शेठ अग्रवाल, व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा, ठाकरे सेनेचे शहर प्रमुख सनी वाघ , गोदामाता प्रतिष्ठानचे अजिनाथ ढाकणे, सुनील फंड, शिंदे सेनेच्या महिला जिल्हाप्रमुख विमल पुंडे , बडदे प्रतिष्ठानच्या बडदे नानी, माजी नगरसेवक बबलू वाणी. विजया देवकर आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.







