आर्थिक विकासाच्या प्रवाहात जी. एस. महानगर बँक परिवारात सामील व्हा!- गीतांजली शेळके

आर्थिक विकासाच्या प्रवाहात जी. एस. महानगर बँक परिवारात सामील व्हा!- गीतांजली शेळके

In the flow of economic development, G.S. S.S. Join the Metropolitan Bank family!- Geetanjali Shelke

आता लक्ष दहा हजार कोटी ठेवींचे

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Mon 30Jun 16.40 P m.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : महानगर बँक ही अनेकांना छत्र छाया देणारी बँक आहे बँकेने आजपर्यंत अनेकांची  आर्थिक व शैक्षणिक उन्नती केली आहे.अशी ही संस्था टिकवणे महत्त्वाचे आहे आता सिमोल्लंघन झाले आता एकजुटीने धोरण ठरवू ,  निवडणुकीत मतदारांना  दिलेली वचने पाळणार, नव्या शाखा, नवीन तंत्रज्ञान यातून भविष्यात दहा हजार कोटींचा टप्पा पार पाडणार  असल्याची ग्वाही देताना आमच्या या संकल्पाला कोपरगावकरांनो प्रतिसाद देऊन एक पाऊल पुढे टाकावे ,आम्ही सर्व सेवा देण्यास तयार आहोत, आपण महानगर बँक परिवारात सामील व्हा असे आवाहन जी.एस. महानगर बँकेच्या  नवनिर्वाचित चेअरमन गीतांजली उदय शेळके यांनी केले.  दुःख हेच आहे आज उदयदादा शेळके पाहिजे होते अशी खंत व्यक्त करताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

अध्यक्षस्थानी महानंदाचे  माजी उपाध्यक्ष तथा  श्रीमती गीतांजनीताई शेळके नागरी सत्कार समिती, कोपरगांव अध्यक्ष राजेंद्र (बापू) जाधव हे होते.

जी एस महानगर बँक पंचवार्षिक निवडणूकीत  श्रीमती गीतांजलीताई उदय शेळके यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल व त्यांची बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सौ. रोहिणी व श्री माधवराव माणिकराव देशमुख,सौ. मिनल व श्री. संग्राम माधवराव देशमुख यांनी निमंत्रित केलेल्या “विजयोत्सव कोपरगांवच्या लेकीचा’.. व  त्यांच्या सर्व संचालक मंडळाचा जाहीर नागरी सत्कार शनिवारी  २८ जून  रोजी दुपारी ३.०० वाजता कृष्णाई बँक्वेट हॉल, छत्रपती संभाजी महाराज चौक, या ठिकाणी आमदार आशुतोष काळे आमदार सत्यजित तांबे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, महाराष्ट्र फर्टीलायझर असोसिएशनचे अध्यक्ष कैलास ठोळे, गोदावरी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश परजणे, महाराष्ट्र राज्य फेडरेशन पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रमुख सत्कारमूर्ती गीतांजली उदय शेळके बोलत होत्या.
सत्कारमूर्तींचा परिचय उपस्थित मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाची प्रास्ताविक अध्यक्ष राजेंद्र बापु जाधव यांनी केले.

यावेळी बोलताना बिपिन कोल्हे सॉलिसिटर गुलाबराव शेळके स्वर्गीय उदय शेळके व कोल्हे कुटुंबीय यांच्यात असलेल्या ऋणानुबंधांचा उल्लेख केला ते पुढे म्हणाले, निवडणूक म्हटले की लढाई असते त्यात कुटुंबातील लढाई ही आणखी मोठी लढाई  असते अनेक प्रश्न उभे राहतात परंतु गीतांजलीताई व त्यांच्या सहकाऱ्यांना मतदारांनी एकतर्फी मतदान करून विश्वास दाखवला आहे देश पातळीवर बँकेचे नाव नेणे इतके सोपे नाही गीतांजली ताई यांच्यावर सासरमाहेर दोन्हीकडचे संस्कार आहेत. मला खात्री आहे गीतांजली ताई ही जबाबदारी 100 नव्हे तर  200% यशस्वीपणे पार पाडतील, या शब्दात त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आमदार आशुतोष काळे म्हणाले,  स्वर्गीय उदय शेळके आणि माझा जिल्हा बँकेच्या माध्यमातून संबंध आला कर्ज कोणाला द्यायचे आणि कर्ज कोणाला नाही म्हणायचे असा स्पष्ट वक्तेपणा त्यांच्या ठायी होता शिस्त व काटेकोरपणा हे त्यांचे विशेष गुण होते ‌बँक कशी चालवायची हा सहकाराचा  वारसा व माहेरच्या संस्काराचा आधार गीतांजली ताईंना मिळाला आहे. जोडीला ज्येष्ठ व तरुण असे संमिश्र संचालक मंडळ त्यांच्या बरोबर आहे. आम्हाला आपला अभिमान आहे आपण निश्चितच उद्दिष्ट पूर्ण करालं, यात शंका नाही असा विश्वास व्यक्त केला. कोपरगावकरांनी माझे आजोबा स्वर्गीय शंकरराव काळे यांना संधी दिली नाही ती संधी आमदारकीच्या माध्यमातून पारनेर करांनी दिली ते मंत्री झाले हे पारनेर करांचे ऋण मी विसरू शकत नाही अशा भावना आमदार काळे यांनी व्यक्त केल्या, गौतम बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे  हे दोन्ही अधिकारी पारनेरचे असल्याचा धागा पकडून गौतम बँक असो की महानगर बँक  पारनेरकरांवरच चालते असा मिस्किल टोला देखील आमदार काळे यांनी यावेळी लगावला.

यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले आजचा हा सत्कार सोहळा शेळके परिवारासाठी आनंद आणि काळजी असा भावनिक व संमिश्र दिवस आहे प्रतिकूल परिस्थितीत आव्हाने आली ते लढले जिंकले नवे एकतर्फी मतांनी विजय मिळवला. गीता ताईने जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या गुणांच्या चुणूक दाखविली आहे पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून आपलं कार्य उभं केलं आहे शेळके घराण्यातील वकिलीचा वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला आहे आम्ही सर्वजण परिवार म्हणून त्यांच्यासोबत आहोत अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

उद्योजक कैलास ठोळे म्हणाले रोज बदलणाऱ्या रिझर्व बँकेच्या नियमामुळे बँकिंग क्षेत्रात कार्य करणे मोठे अवघड झाले आहे  ठेवी कशा गोळा करायच्या? पैसे कोणाला वाटायचे? कसे वाटायचे? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. अशा मोठ्या परिस्थितीत गीतांजलीताईंना व त्यांच्या सहकाऱ्यांना आव्हाने पेलावी लागणार आहेत ते निश्चितच यात यशस्वी होतील अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी  काका कोयटे म्हणाले कोपरगाव च्या लेकी जिथे जातात तिथे त्या नाव कमावतात याची अनेक उदाहरणे यावेळी कोयटे यांनी दिली. महानगर ही सक्षम आर्थिक बँक आहे लोकांचा तिच्यावर असलेला विश्वास अभिमानास्पद आहे रिझर्व बँकेचे सर्व निकष पाळले जात असून कोपरगाव सारख्या शहरात महानगर बँकेसाठी मोठा वाव आहे. आज केवळ शुभेच्छा देत नाही तर समता बँकेची एक कोटीची  ठेव महानगर बँकेत ठेवत आहे तो धनादेश त्यांनी गीतांजली ताई शेळके यांच्याकडे  सुपूर्त केला.

यावेळी  महानगर बँकेचे सि.बा. अडसूळ यांनी आपले मत व्यक्त करताना बँकिंग क्षेत्रात आज गळचेपी स्पर्धा आहे यासाठी तंत्रज्ञानाची कास धरावीच लागेल काळाबरोबर न चालावे तर स्थान गमवावे लागेल आव्हाने पिण्यासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज आहे ते आम्हाला गीता ताईच्या रूपात मिळाले आहे निवडणुकीत टीकेला आम्ही घरदार पद्धतीने उत्तर दिले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बँकेचे उपाध्यक्ष भास्कर कवाद यांनी स्वर्गीय शंकरराव काळे स्वर्गीय शंकरराव कोठे व कोपरगावकरांचा असलेला आपला ऋणानुबंध याची माहिती देत केलेल्या सत्कार बद्दल कोपरगावकरांचे आभार मानले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री पिंगळे मॅडम यांनी केले तर शेवटी आभार पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी व्यक्त केले

Leave a Reply

You cannot copy content of this page