मतदार संघातील चार गावातील जिल्हा परिषदेच्या आठ शाळा खोल्यांना ९६ लाखाचा निधी- आ. आशुतोष काळे

मतदार संघातील चार गावातील जिल्हा परिषदेच्या आठ शाळा खोल्यांना ९६ लाखाचा निधी- आ. आशुतोष काळे

96 lakh for eight school rooms of Zilla Parishad in four villages of constituency Ashutosh Kale

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Wed 24Jun 17.40 P m.By  सालकर राजेंद्र 


कोपरगाव :-  सातत्याने केलेली मागणी व प्रस्तावाप्रमाणे कोपरगाव  तालुक्यातील चार गावातील जिल्हा परिषदेच्या  आठ शाळा  खोल्यांसाठी  प्रत्येकी १२ लाख रुपये प्रमाणे ९६ लाखाचा  निधी मंजूर झाला असल्याची माहिती कोपरगाव मतदार संघाचे आमदार आशुतोष  काळे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना नवीन खोल्यांची आवश्यकता असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील विविध गावातील शाळा खोल्या नव्याने बांधणे गरजेचे होते. त्यासाठी शाळा खोल्यांना निधी मिळावा याबाबत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सन २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील धामोरी,  डांगेवाडी, 

डाऊच बु. व रांजणगाव देशमुख (खालकर मळा) ह्या ४ गावातील शाळांमध्ये नव्याने ०८ नवीन शाळा खोल्या बांधण्यासाठी प्रत्येकी १२ लक्ष याप्रमाणे ९६ लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांचे आभार मानले.

उर्वरित गावातील शाळा खोल्यांना देखील लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु असून त्या शाळा खोल्यांना देखील निधी प्राप्त होवून त्या शाळा खोल्यांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. निधी मंजूर करून आणल्याबद्दल धामोरी, डांगेवाडी, डाऊच बु. व रांजणगाव देशमुख गावातील नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page