दुतर्फा झाडांत अडकल्या तारा; वारंवार वीज खंडित: गुलमोहर कॉलनीत झाड कोसळल्याने ग्राहकांना फटका
Tara stuck in a double-sided tree; Frequent power outages: Tree falls in Gulmohar Colony
वीज वितरण आणि नगरपालिका संयुक्तपणे छाटणी करण्याची गरज
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Tue8July 16.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : यावर्षी मे महिन्यामध्ये वादळसह जोरदार अवकाळी पाऊस झाला त्यानंतर जून जुलै ची सुरुवात वादळी पाऊसाने झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वी रात्री गुलमोहर कॉलनीतील लिंबाचे मोठे झाड मुळासकट उन्हाळून पडले त्यामुळे या कॉलनीतील नागरिकांना सुमारे 18 ते 20 तास अंधाराचा सामना करावा लागला.
अशीच काहीशी स्थिती शहरातील विविध भागात झाडांच्या फांद्या तारांवर पडून वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. त्यामुळे नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले, त्यावर मान्सूनपुर्व कामे सुरू असल्याचा दावा करत महावितरणकडून कामेही सुरू झाली आहेत झाडे छाटणी करण्यासाठी किंवा तोडण्यासाठी पालिकेची परवानगी गरज लागते एवढ्या सोपस्कार करण्यामध्ये बराच वेळ जातो त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांबरोबर मात्र त्यांच्या जोडीला नगरपालिकेने टीम देऊन संयुक्तपणे झाडे छाटणी करण्याची मोहीम राबविण्याची गरज आहे.
मात्र, पावसाने उघडीप दिल्यावर ही कामे पुन्हा थंडावली अर्धा वर्षांपूर्वी नागरिक व नगरपालिकेच्या उत्साहाने उत्साहामुळे मोठ्या प्रमाणात शहरात वृक्ष लागवड करण्यात आली वृक्ष प्रेमाच्या भरात विद्युतदारांच्या रोडच्या कडेला वृक्ष लावण्याच्या अट्टाहासापायी अनेक बऱ्याच ठिकाणी विद्युत तारांच्या खाली झाडांची लागवड करण्यात आली आजही झाडे मोठी झाल्याने संपूर्ण शहरात विजेच्या तारा झाडांमधून गेल्याचे चित्र पाहावयास मिळते परिणामतः शहरांमध्ये थोडा वाऱ्यासह बहुत पाऊस सुरू होताच झाडांच्या फांद्यामध्ये विद्युत तारा अडकल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वारंवार वीज खंडीत होते. याचा फटका त्या त्या परिसरातील शेकडो वीज ग्राहकांना बसतो.वीज खंडित प्रमाण होण्याचे प्रमाण वाढले आहे दुसरीकडे यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत आहे भर पावसात तारा जोडण्याऐवजी फांद्या कापून तारा जोडावे लागत असल्याने वेळ जातो पर्यायी नागरिकांना अंधारात राहावे लागते
वाहतूक किंवा वीज वहनास अडसर ठरणाऱ्या फांद्याची छाटणी नियमित होत नाही. याचाच परिणाम म्हणून वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडतात तर कधी फांद्याही तूटन पडतात. बहुतांश झाडे ही रस्त्यालगत असल्यामुळे ती वीजेच्या तारांवर पडल्यास वीजपुरवठा खंडीत होतो. आपत्कालीन परिस्थितीत रात्र अंधारात काढावी लागते. .
सातत्याने होते वीज गायब अडथळा ठरणाऱ्या फांद्या महावितरणकडून तोडल्या जात आहेत. वाकलेले खांब सरळ करणे किंवा बदलणे, नवीन रोहित्र बसवण्याला प्राधान्य देत पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने पूर्ववत करता यावा, यासाठी मान्सूनपूर्व कामे केली जात आहेत. मात्र, अनेकदा फांद्या छाटण्यासाठी मजूर मिळत नाही. असे असले तरी सर्वेक्षण करून या भागातील फांद्या छाटणीसह इतर कामेही लवकरच केली जातील, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता डि.पी. धांडे,सहाय्यक अभियंता ए.बी. खंदारे, सहाय्यक अभियंता डी.जी. पंडोरे यांनी दिली.
या ठिकाणी कंपनीच्या तारांच्या खाली झाडे उगवलेली आहेत अशा ठिकाणी कोपरगाव शहरातील सर्व गणेश मंडळ व वृक्षप्रेमींनी या वृक्ष छाटणी मोहिमेत स्वतः भाग घेऊन मदत करावी नवीन वृक्ष लावताना विद्युत तारा खाली वृक्ष लावू नये असे आवाहन माजी नगरसेवक बबलू वाणी यांनी केले .
कोपरगाव शहरात नगरपालिका, पोस्ट ऑफिस, जिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालय,पंचायत समिती तहसील कार्यालय पोलीस स्टेशन, राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था, विमा कार्यालये, एटीएम, शाळा, महाविद्यालये असून वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे रुग्णसेवेसह इतर नागरी सुविधांवर परिणाम होतो.-प्रशांत वाबळे, नागरिक





