शहरातील “प्रत्येक प्रभाग आदर्श प्रभाग व्हावा”- आ. आशुतोष  काळे 

शहरातील “प्रत्येक प्रभाग आदर्श प्रभाग व्हावा”- आ. आशुतोष  काळे 

“Every ward in the city should be an ideal ward”- Hon. Ashutosh Kale

शहरात एक कोटी  ३३ लाखाच्या  विकास कामांची सुरुवात

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Wed9July 19.10 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : नागरिकांच्या मूलभूत गरजांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना पायाभूत सुविधा देऊन समृद्ध कोपरगावच्या दिशेने वाट चाल करताना “प्रत्येक प्रभाग आदर्श प्रभाग व्हावा” हा आपला कटाक्ष असून यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात केले.

शहराच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आमदार आशुतोष काळे यांनी पालिकेच्या प्रभाग चार व सात मधील एक कोटी ३३ लाख रुपयांच्या  विकास कामांचा शुभारंभ केला.

आ. काळे पुढे म्हणाले की, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास करण्याचा आपला प्रयत्न असून यामुळे  भविष्यातील पिढीचे आयुष्य सुखकर होईल. स्वच्छता आरोग्य वीज पाणी रस्ते या मूलभूत सुविधांपासून शहरातील कोणताही भाग दुर्लक्षित राहू नये यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभाग चार मधील विकास कामांचे भूमिपूजन करताना

सुरू करण्यात आलेल्या या विकासकामांमध्ये प्रभाग क्र. ४ मध्ये महिला महाविद्यालय ते श्री बिरोबा मंदिर, औताडे घर ते नवीन शर्मा घर तसेच नविन शर्मा घर ते गारदा नाला याठिकाणी भूमिगत गटार करणे. सोळसे घर ते शंकर वाघ घर, मैंद घर ते नवनाथ हुसळे घर पेव्हिंग ब्लॉक बसवणे,कालिकानगर फरताळे दुकान ते सुकदेव कोळगे,वडांगळे घर ते शेखर रहाणे व सातपुते घर ते घेमूड घर ते काळे घर रस्ता करणे. प्रभाग क्र. ७ मध्ये बिस्मिल्ला हॉटेल ते खंदक नाला व अस्लम शेख वखार ते जब्बार कुरेशी घर भूमिगत गटार करणे आदी कामांचा समावेश आहे.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page