अंधश्रद्धेचा कळस! कावीळ झालेल्या महिलेला मांत्रिकाने पाजलं मंतरलेलं तेल, झाला मृत्यू
The peak of superstition! The magician burned the woman who had become a poet with anointed oil and she died
महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये शहर पोलिसात गुन्हा दाखल
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sat12July 19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपरगाव शहर पोलीस स्टेशन परिसरातील खडकी प्रभागात अंधश्रद्धेमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूवर संतप्त भावाने दिलेल्या फिर्यादीवरून मांत्रिक चर्च फादरच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला .
वनिता विश्वनाथ हरकळ रा. खडकी, तालुका कोपरगाव (४२) हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. भाऊ संजय जीवन पंढरे (४९) काळे वस्ती मारुती मंदिराजवळ खडकी हल्ली मुक्काम खेड शिवापुर जिल्हा पुणे यांनी सांगितलं की, बहिण वनिता कावीळ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
त्यानंतर समता नगर चर्च चे फादर चंद्रशेखर गौडा रा. बागुल वस्ती कोपरगाव या मांत्रिकाने तिला दवाखान्याचा काही आजार नाही. तिला बाहेरचे काही तरी झालेले आहे. ती औषधाने बरी होणार नाही. तिला मंत्र मारुन तेल देतो. ते तुम्ही तीन चार दिवस पिल्यानंतर बरे होवुन जाईल तुम्हांला कुठे दवाखान्यात जाण्याची गरज नाही असे सांगुन फादर यांनी त्यांचेकडेस असलेली परेशुट तेलाची बाटली बाहेर काढुन त्यावर हात ठेवुन काही तरी जादु टोना करुन, मंत्र मारुन, पाणी हाताने बाटलीवर शिंपडुन ते बाटलीतील तेल कपाळाला लावण्यास सांगुन त्रास होईल तेव्हा बाटलीतील तेल पिण्याचे सांगितले. त्याप्रमाणे बहीन वनिता हिने त्या बाटलीतील जादू टोना केलेले तेल कपाळाला लावले व प्यायलं होते.
तिची प्रकृती बिघडल्यानंतर उपचारासाठी तिला लोणी प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण दोन-तीन दिवसाच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला.आरोपीचे निष्काळजीपणाचे व बेजबाबदारपणाचे कृत्यामुळे आपली बहीण मयत झाली असल्याची तक्रारीत म्हटले असून विरोधात पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी किशोर पवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





