छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनोस्कोच्या यादीत; महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण ! – विवेक कोल्हे
12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj on UNESCO list; Moment of pride for Maharashtra! – Vivek Kolhe
अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून समावेश; हा ऐतिहासिक निर्णय
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sat12July 19.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून दिली. या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण असल्याने कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी महाराष्ट्राच्या निर्णयाचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.

या जागतिक वारसा स्थळांमध्ये समा
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या निकषांवर या १२ किल्ल्यांची निवड झाली. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी या मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या.
“यावर प्रतिक्रिया देताना विवेक कोल्हे म्हणाले शिवाजी महाराज हे आपल्या संस्कृतीचे आणि अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांचे कार्य आणि विचार आजही लोकांना प्रेरणा देतात. हे किल्ले केवळ लढाया किंवा प्रशासनाचे केंद्र नव्हते, तर धैर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रेरणेची जिवंत उदाहरणे होती.जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्यामुळे या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अधिक निधी, तांत्रिक सहाय्य आणि जागतिक पातळीवर पर्यटनाला चालना मिळेल, शिवछत्रपतींच्या कार्याचा जागतिक सन्मान आहे.”
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र शासन, पुरातत्त्व विभाग व इतर संबंधित संस्थांचे विशेष अभिनंदन करून, युवानेते विवेक कोल्हे यांनी या किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत पर्यटन विकासासाठी जनसहभाग वाढवण्याचे आवाहन करताना हा निर्णय संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवकांसाठी चेतना देणारा आहे





