राज्य पतसंस्था फेडरेशनला सहकार खात्याने बळ द्यावे- देवेंद्र फडणवीस

राज्य पतसंस्था फेडरेशनला सहकार खात्याने बळ द्यावे- देवेंद्र फडणवीस

Cooperative Department should strengthen State Credit Union Federation: Devendra Fadnavis

राज्य शिखर समितीत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu17July 18.20 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या कार्यक्रमांसाठी”सहकार खात्याने   आवश्यक सर्व सहकार्य व पाठबळ द्यावे,” असे स्पष्ट आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य शिखर समितीची बैठकीत दिले. 

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेवरून महाराष्ट्र सरकारने शिखर समिती स्थापन केली आहे या बैठकीत विविध सहकारी उपक्रमांच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष  काका कोयटे यांनी  आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या प्रारंभी  शिर्डी येथे  आंतरराष्ट्रीय सहकार परिषद, महाराष्ट्रभर सहकार दिंडीचे आयोजन, तसेच पुढील काही महिन्यांत अहमदपूर येथील सहकार मंत्र्यांच्या गावापासून ते नागपूर (मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान) या मार्गावर सहकार ध्वज संचलन यात्रा,बुलढाणा येथे पतसंस्थांच्या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा,  तसेच गाव तिथे सहकार चौक या संकल्पनेतून प्रत्येक गावात सहकाराचे केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना  दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व उपक्रमांचे मनापासून स्वागत करताना सहकार चळवळीच्या नव्या पर्वाची ही सुरुवात असून, राज्यातील सहकारी पतसंस्था आता आंतरराष्ट्रीय सहकार विचारांचे प्रतिनिधित्व करत असून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे स्वागत करताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले
यावेळी काका कोयटे यांनी अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या कंपन्यांच्या धरतीवर राज्य फेडरेशन देखील सहकार बास्केट या संकल्पनेसाठी तसेच नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत सहकारी पतसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी पदविका अभ्यासक्रम सुरू होत आहे सहकारी पतसंस्थांच्या कायद्यात अमुलाग्र बदल करावे, यासाठीच्या समितीत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करावा, राज्य फेडरेशनच्या सिबिल सारख्या क्रास प्रणालीची अंमलबजावणीसाठी सहकार खात्याने सहकार्य अशी मागणी  केली.
या बैठकीस सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री मा.माणिकराव कोकाटे, सहकार आयुक्त श्री दिपक तावरे, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे आणि विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page