कमवा आणि शिका’ ही योजना आयुष्याच्या जडणघडणीत एक महत्त्वाचे पाऊल- पराग संधान

“कमवा आणि शिका’ ही योजना आयुष्याच्या जडणघडणीत एक महत्त्वाचे पाऊल- पराग संधान

Work and Learn’ is an important step in the structure of life

ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu17July 18.30 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: स्वावलंबी शिक्षणाचे ब्रीद जपत, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेसाठी शिक्षणाचा मार्ग खुला  केला त्या रयत मध्ये मी शिकलो याचा मला अभिमान आहे इथे राबविली जाणारी कमवा आणि शिका ही योजना आयुष्याच्या जडणघडणी च्या  दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे यापुढे विद्यार्थिनींना सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही अमृत संजीवनी चे चेअरमन पराग संघाने यांनी दिली. 

कै. शिवाजीराव आनंदराव संधान यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.सी.एम. मेहता कन्या विद्या मंदिर येथील विद्यार्थिनींना  शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. 
यावेळी अमृत संजीवनी चे चेअरमन पराग संधान, ज्येष्ठ नागरिक मंचाच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे, जेष्ठ नागरिक मंचचे विजय बंब, उत्तमभाई शाह, श्वेताताई कोठारी, मधुबालाताई उपाध्ये, कमलाताई उपाध्ये, डॉ. विलास आचारी, ज्येष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी, सोनमताई कोठारी, पुष्पाताई कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर येथील प्राचार्या धनक मॅडम, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थिनींनी शालेय साहित्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि आयोजकांचे आभार मानले.
 

Leave a Reply

You cannot copy content of this page