ठेकेदाराने हप्ता न दिल्याने ‘उड्डाण’पुलाचे काम बंद पाडलं; या प्रकाराची जिल्हाभर चर्चा

ठेकेदाराने हप्ता न दिल्याने ‘उड्डाण’पुलाचे काम बंद पाडलं; या प्रकाराची जिल्हाभर चर्चा

The work on the ‘Uddan’ bridge was stopped due to the contractor not paying the installments; This incident is a topic of discussion throughout the district

रस्त्याचे काम वेग घेईना, खड्डय़ांचा त्रास संपेना!

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 23July 20.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: सावळीविहीर  ते कोपरगाव या 752 महामार्गाच्या रस्त्याचे काम वेग घेईना, खड्ड्यांचा त्रास संपेना, त्यात भरीस भर म्हणून  कोपरगावातुन धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कंत्राटदाराने हप्ता न दिल्याने काही तरुणांनी  पुणतांबा चौफुली येथील ‘उड्डाण’पुलाचे काम बंद पाडलं आहे. हप्ता मागणाऱ्या तरुणांनी कोणाचे  नाव न घेतल्याने याप्रकारात वेगवेगळ्यांची नावे घेऊन आता कोपरगाव शहरात चर्चा रंगू लागल्यात. काहींनी जुने प्रकरणांचे दाखले देऊन हा तोच असेल, असे चर्चेत येऊ लागले आहे. या चर्चेमुळे कोपरगाव शहरातील राजकीय वातावरण तापून गढूळ बनले आहे.

गेल्या सात-आठ वर्षापासून नगर कोपरगाव या रस्त्यासाठी तब्बल साडेनऊशे कोटी रुपयांचा निधी येऊन देखील हा रस्ता होऊ शकला नाही. सुदैवाने म्हणा की दुदैवाने नगर सावळीविहीर असा स्वतंत्र रस्ता झाला व सावळीविहीर  ते कोपरगाव हा 752 नवा महामार्ग झाला. याला दीडशे कोटी निधी आला. अनेकांनी याचा श्रेयवाद घेतला आठ पंधरा दिवस  श्रेयवादाच्या बातम्या झळकल्या.  गेल्या दोन वर्षभरापासून सावळीविहीर ते कोपरगाव 752 राष्ट्रीय महामार्गाचे काम धिम्या गतीने चालू आहे. 
 जुना नागपूर मुंबई व नगर मनमाड या महामार्गावरील पुणतांबा चौफुली असल्याने या ठिकाणी ‘उड्डाण’पूल प्रस्तावित आहे हा भाग शहराच्या जवळील मुख्य भाग आहे. काम तातडीने व्हावे यासाठी ठेकेदाराने ‘उड्डाण’पुलाच्या  कामासाठी स्टीलची बांधणी केली होती. मात्र ही केलेली बांधणी पुन्हा एकदा उस्तारूण स्टील काढून घेण्यात आल्यामुळे या पुलाचे काम हप्ता मागण्याच्या प्रकारावरून चर्चेत आले आहे.

  काश्मीर ते कन्याकुमारी असा देशातील दोन टोकांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग असून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनाचे मोठ्या प्रमाणात वाहतूक या मार्गाने असते. परंतु रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहतूक कोंडी वारंवार होत आहे. दुसरीकडे या मार्गावर ठिकठिकाणी प्रचंड खड्डे पडेल असल्याने नागरिकांच्या त्रासात दिवसेंदिवस भर पडत आहे.धुळीचे लोट उठत आहेत. हे सहन करावे  लागत आहे. पाऊस पडला की वाहनांची  व नागरिकांची घसरण होऊन अपघात होत असतात.

कंत्राटदारावर मोठा दबाव असल्याने त्यामुळे हे काम तातडीने व्हावे. यासाठी कंत्राटदार प्रयत्नरत आहे त्या अनुषंगाने त्याने पुणतांबा चौफुली या ठिकाणी ‘उड्डाण’पुलाच्या कामाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात स्टील बांधणी केली होती. हे काम युद्ध पातळीवर सुरू असताना  कंत्राटदाराकडे काही तरुणांनी तू  हप्ता का दिला नाही असे म्हणत हे काम बंद पाडलं. हप्ता मिळेपर्यंत काम करू नको म्हणून देखील बजावले आहे. असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच गेल्या चार-पाच दिवसांपासून स्टील बांधणीचे काम  बंद पडलेले आहे. कंत्राटदाराने बांधलेले स्टील काढून डेपोवर परत नेले‌ आहे. हप्ता मागण्यासाठी आलेले तरुण कोणाचे होते? कोणाला हप्ता पाहिजे आहे?  हप्ता कसला? असे अनेक प्रश्न आता चर्चेत आले आहेत. या हप्ता प्रकरणामुळे   शहरातील गाव कट्यावर बसून थेट  चर्चा रंगल्या आहेत. यातून काहींमध्ये वादाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. ठेकेदाराच्या नावाखाली जिरवा-जिरवी सुरू असावी का? , अशीही देखील चर्चा होत आहे. या कंत्राटदार वादांमुळे  रस्त्याच्या कामात दिरंगाई होणार, . या हप्ता प्रकरणामुळे हा ‘उड्डाण’पूल आता राजकीय वादत अडकणार की काय, असे चित्र आहे. तो रखडल्यास  वेळप्रसंगीत विरोधकांकडून आंदोलन पुकारण्याचा देखील सूर आहे. यावरील चर्चेने अधिक जोर धरला आहे. यातून राजकीय धुमारे आगामी काळात फुटणार हे निश्चित आहे.

पर्यायी रस्त्याची सबब पुढे केली जात असली तरी या उड्डाणपुलाचे काम हप्ता न दिल्याने काम बंद पाडले  या चर्चेच्या आधारे आमच्या प्रतिनिधीने संबंधिताबरोबर चर्चा केली असता  संबंधितांनी “अगा हे घडलेच नाही” म्हणजे “अरे, हे असे काही घडलेच नाही”असे म्हणत, चक्क कानावर हात ठेवून, स्पष्ट नकार दिला.

कोट 

पुणतांबा चौफुली व बेट नाका या दोन ठिकाणी उड्डाणपूल असून जगताप पेट्रोल पंप ते जुनी गंगा असा पहिला  600 मीटर अंतराचा उड्डाणपूल असून बेट नाका ते देवयानी दूध डेरी असा 800 मीटरचा दुसरा उड्डाणपूल आहे. कंत्राटदाराने पर्यायी रस्ता न करता थेट पुलाचे काम चालू केले होते त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती ही बाब लक्षात आल्याने ठेकेदाराला आधी पर्यायी रस्ता करण्याचे आदेश देण्यात आले व हा रस्ता ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे अल्टीमेटर कंत्राटदाराला देण्यात आला आहे. त्यानंतरच पुलाचे काम करावे अशी नोटीस बजावण्यात आली आहे – अभिमन्यू जमाले, सहा.अभियता, राष्ट्रीय महामार्ग,  संगमनेर 

चौकट 

आम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्रास झालेला नाही किंवा कोणीही पैसे मागितलेले नाही किंवा कोणाच्या सांगण्यावरून आम्ही स्टील काढून घेतलेले नाही तर या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने महामार्ग विभागाकडून आम्हाला पर्यायी रस्ता पूर्ण करा व नंतरच पुलाचे काम करा अशी नोटीस बजविण्यात आल्यामुळे आम्ही येथील बांधलेले स्टील काढून नेले – सोमनाथ रूपनर,  प्रोजेक्ट मॅनेजर, यादव ॲण्ड यादव कंपनी पुणे.

Leave a Reply

You cannot copy content of this page