कोपरगाव नगरपालिकेने अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या दहा लाखाचा खर्च पाण्यात !
Kopargaon Municipality spent Rs 10 lakhs to remove encroachments in water!
८०० अतिक्रमणे काढल्याचा पालिकेचा दावा; मोहीम ठराविक अतिक्रमणांना टार्गेट करण्यासाठी होती का ?
कोपरगाव: (राजेंद्र सालकर)काही महिन्यापूर्वी कोपरगाव शहरातील ८०० अतिक्रमणं काढण्यासाठी नगरपालिकेने केलेला दहा लाखाचा अतिक्रमणाचा खर्च आजची जैसे थे स्थिती पाहता पाण्यात गेला ” याचा अर्थ असा होतो की, ही अतिक्रमण मोहीम ठराविक अतिक्रमणधारकांना टार्गेट करण्यासाठी होती का ? असा संशय देखील बळावला आहे.
अतिक्रमणे काढण्यासाठी केलेला खर्च वाया गेला, किंवा तो वसूल होऊ शकला नाही. म्हणजेच, अतिक्रमण हटवण्यासाठी जो पैसा खर्च झाला, तो व्यर्थ गेला, असा त्याचा अर्थ आहे.

शहरात काही महिन्यांपूर्वी राबवण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेत ८०० च्या वर अतिक्रमणे काढण्यात आली, त्याचा खर्च दहा लाख १ हजार ७६१ रुपये जीएसटी सह आला असून तो खर्च नगरपालिका फंडातून करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी दिली.
अतिक्रमण म्हणजे नगरपालिकेच्या जमिनीवर किंवा जागेवर बेकायदेशीरपणे केलेला ताबा शहरातील वेगवेगळ्या भागात गुण्यागोविंदाने व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांची तसेच रहिवाशांची झोप उडाली. तब्बल ८०० मालमत्तांवर लाल फुल्या मारण्यात आल्या. बरे कोणाची तक्रार नसताना अचानक संपूर्ण महाराष्ट्रात अतिक्रमण मोहीम सुरू झाली त्याची री ओढत कोपरगाव नगरपालिकेने सुद्धा तातडीने अतिक्रमण मोहीम हातात घेऊन आपली कार्य तत्परता दाखवली.अतिक्रमण काढण्यासाठी सरकार विविध प्रकारचे खर्च करतात, जसे की जेसीबी, मनुष्यबळ, कायदेशीर प्रक्रिया इत्यादी इथे मात्र पालिकेने नगरपालिका फंडातून अर्थात जनतेच्या कराच्या पैशातून सरळ हाताने तब्बल दहा लाख १हजार ७६१/- रुपये खर्च करून यासाठी एकूण १४ जेसीबी, चार डंपर, चार ट्रॅक्टर लावण्यात पालिकेच्या संपूर्ण कामगार वर्ग पोलीस फौज फाटा बळाचा सतत दोन दिवस १३ ते १४ तास राबविण्यात आला. यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी तयार झालेला हा माती व विटा यांचा ढिग सगळा राडा उचलण्यासाठी पालिकेला तब्बल आठवडा लागला. अनेक लोकांचे तोंडचे पाणी पळाले चालू धंदा बंद झाला घराच्या मुख्य दरवाजा तोडण्यात आल्याने घर तुटले संसार उघड्यावर आले. ही वस्तुस्थिती शहरातील नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी उरावर दगड ठेवून पाहिलीयं नगरपालिकेला नागरिकांनी संयम राखून साथ दिली. आज पर्यंत कोपरगाव ते तीन वेळा अतिक्रमण मोहीम राबविण्यात आल्या येथील लोकांना उध्वस्त करण्यात आले त्या जागी नव्याने लोकांनी पथाऱ्यात थाटल्या,, अनेकांनी पुनर्वसन करण्याच्या डरकाळी ठोकल्या जे उध्वस्त झाले त्यांचे आजपर्यंत पुनर्वसनही कधी झाले नाही, अथवा कोणत्याही प्रकारचे खोका शॉप बाबत निर्णय त्यांच्या बाबतीत पालिका प्रशासनाने घेतला नाही.
विविध राजकीय पक्षांनीही अतिक्रमणधारकां च्या केवळ बैठका घेतल्या, मुंबई दरबारी प्रश्न मांडले, आश्वासने दिली, पण तो प्रश्न आत्तापर्यंत अनुत्तरीत राहिला गेला आहे. आता पुन्हा जेथे अतिक्रमणे काढण्यात आली होती, तेथे पुन्हा नागरिकांनी आपापली दुकाने थाटली आहेत. पालिका प्रशासन वेळोवेळी शहरातून स्पीकर वरून अतिक्रमणे करू नका हातगाड्या रस्त्यावर लावू नका अन्यथा दंड करण्यात येईल अश्या पोकळ सूचनाकडे दोन महिन्यात स्थापित झालेले संबंधित अतिक्रमणधारक त्याकडे दुर्लक्ष करतात. काहींना पालिकेने दंडही केले आहेत. मात्र ही समस्या जैसीथेच आहे.
अतिक्रमणे काढताना पालिका प्रशासन व नागरिकांच्या हमरी तुमरी झाल्या आहेत. पालिका प्रशासनाने आत्तापर्यंत तीन वेळा राबवलेल्या अतिक्रमण मोहिमेचा लाखो रुपयांचा खर्च नगरपालिका फंडातून केल्याने म्हणजेच नागरिकांच्या कर रुपी पैशातून केला गेला, मात्र तो वाया गेला असून अतिक्रमणे पुन्हा होत आहेत त्याबाबत सुजाण नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात मोकाट जनावरांचा, श्वानांचा, गाढवांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट आहे. एकंदरीत पालिकेच्या समस्या सुटता सुटत नाही अशी स्थिती आहे.
जर हा खर्च वसूल होऊ शकला नाही, किंवा अतिक्रमण काढण्यात यश आले नाही, तर तो खर्च वाया गेला, किंवा पाण्यात गेला असेच म्हणावे लागेल





