छत्रपती शिवरायांचे अखंड हिंदुस्तानचे स्वप्न स्वराज्याचे साम्राज्य करून थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पूर्ण केले-  खा. विनय सहस्रबुद्धे

छत्रपती शिवरायांचे अखंड हिंदुस्तानचे स्वप्न स्वराज्याचे साम्राज्य करून थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पूर्ण केले-  खा. विनय सहस्रबुद्धे

Chhatrapati Shivaji’s dream of a united India was fulfilled by the great Bajirao Peshwa by establishing the empire of Swarajya – Kha. Vinay Sahasrabuddhe

कोपरगावात श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat 26July 15.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे छत्रपती शिवाजी महाराज  व स्वराज्याचे खरे सेवक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलेली स्वराज्याची संकल्पना थोरल्या बाजीरावांनी पुढे नेली .अफगाणिस्तान ते अटकेपार झेंडा लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे अखंड हिंदुस्तानचे स्वप्न छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली थोरल्या बाजीराव पेशव्यांनी स्वराज्याचे साम्राज्य करून  पूर्ण केले. असल्याचे प्रतिपादन खासदार विनय सहस्त्रबुध्दे, राज्यसभा, भारत सरकार, यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई होते.

 शनिवारी (२६ जुलै) रोजी लक्ष्मीनगर येथील ब्राह्मण सभा सभागृहाच्या टेरेसवर ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या शुभहस्ते करण्यात आले ‌ यावेळी ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न झाला. या कार्यक्रमात खासदार सहस्रबुद्धे बोलत होते.
यावेळी पुष्करसिंह पेशवा वंशज, पेशवे घराणे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, माजी.आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, पराक्रमाची पूजा बांधण्याचा आजचा दिवस म्हणजे कारगिल विजय दिन, अभिवादन  व आदरांजली व्यक्त करण्याचा आजचा दिवस चांगला आहे. देशभक्ती आणि पराक्रम यांचा पुतळा या पराक्रमाची पूजा आपण बांधतो थोरले बाजीराव पेशवे या पराक्रमाचे प्रतिक आहे या भावनेतून या स्मारकाकडे व कार्यक्रमाकडे बघितलं तर थोरल्या बाजीराव  यांच्या  दृष्टिकोनाचा थोडा तरी विचार आपल्यात आला असे म्हणता येईल.
खासदार सहस्त्रबुद्धे म्हणाले की, शिवरायांच्या परंपरेतील गुण थोरल्या बाजीरावांच्या ठायी होते. छत्रपती शिवरायांची   मुत्सद्देगिरी  व गनिमी  काव्याला वेगाची जोड देऊन अवघ्या वीस वर्षाच्या कालखंडात ४० लढाया त्यांनी जिंकल्या.. देश-विदेशातील अनेक युद्धकौशल्यातील अभ्यासू सेनानींनी त्यांच्या युद्धकौशल्याविषयी गौरविले आहे. आपण स्वराज्याचे शिलेदार आहोत ही भावना मनात ठेवून  सगळ्यांना एकत्रित बांधून घेण्यात स्वराज्याचे हित आहे मी भावना  सर्वांमध्ये रुजवली त्यामुळे हा देश निरंतर थोरल्या बाजीरावांचा ऋणी आहे या कर्तुत्वाचा गौरव म्हणून आज त्यांचा  पुतळा उभा केलेला आहे.  आपली अस्मिता जातीपाती व गटातटा पुरती राहिली आहे. बेकी निर्माण होणार नाही, तुटफुट होणार नाही याची काळजी घेणे ही प्रत्येक भारतीयाची व  प्रत्येक देशभक्ताची जबाबदारी आहे दुर्दैव आपल्याकडे महापुरुषांची देखील जाती-जातीत विभागणी झाली आहे अशी खंत व्यक्त करताना त्यांनी कवी कुसुमाग्रज यांनी यांच्या  ‘पुतळे’ या कवितेतून मांडलेले विदारक सत्य सांगितले.
कार्यक्रमास कुंदनकुमार साठे,सचिव, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्हाण, पुणे, चंद्रशेखर बर्वे वंशज, पेशवे घराणे, श्रीकांत नगरकर, विश्वस्य, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्हाण, पुणे, प्रविणज कुलकर्णी कोषाध्यक्ष अकिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक,चिंतामणी क्षिरसागर, विश्वस्त, थोरले बाजीराव पेशवे प्रतिहाण, पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. आशुतोष काळे म्हणाले की,विद्यार्थ्यांना शुभेच्छा,मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या थोरले बाजीराव  पेशवे एकही लढाई हरले नाहीत. त्यांचे कार्य व कर्तुत्व आपण विसरू शकत नाही याची कायम आठवण आपल्याला राहील. पुण्यात ४ जुलैला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होते त्यानंतर आज २६ जुलै रोजी हा कार्यक्रम कोपरगाव मध्ये होत आहे याचा निश्चितच अभिमान आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निश्चितच कोपरगाव मध्ये आणू अशी ग्वाही देताना ब्राह्मण  सभेला येणाऱ्या अडचणीसाठी कायम सहकार्य राहील यात शंका ठेवू नका असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, या सभागृहाची वास्तू सर्व पक्षांच्या मदतीने उभी राहिली आहे हे ब्राह्मण सभेचे कौशल्य आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या अतुलनीय पराक्रमाला कर्तबगारिला  बाजूला सारून आज पर्यंत केवळ बाजीराव आणि मस्तानी हेच रंगविले गेले परंतु मस्तानी ही बुंदेलखंडच्या छत्रसाल राजा याची राजकुमारी होती हे विसरून चालणार नाही नेहमी चांगल्या विचारधाराच्या प्रवाहाबरोबर चालले पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हिंदू विचारधारा आहे आपण सर्व या विचारधारेबरोबर चालत आहोत. आमदार आशुतोष काळे यांच्या मताधिक्यात आपले सुद्धा योगदान आहे म्हणून मी त्यांनाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणण्यासाठी आग्रह धरू शकते. असेही त्या म्हणाल्या,

खा.वाकचौरे म्हणाले, मी पहिल्यांदा खासदार झालो त्यावेळेस या वास्तूला पाच  लाख रुपये निधी दिला होता आज ही वास्तू एक कोटीची झाली आहे आता दुसरा मजला सुरू करा मी अकरा लाख देतो अशी ग्वाही दिली. ब्राह्मण सभेचे काम समाजासाठी दिशादर्शक आहे. खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी विनंती केली. 

संजय सातभाई अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले,आजचा दिवस हा आपल्या समाजासाठी अभिमानाचा थोरले बाजीराव यांचे बंधू राघोबा दादा यांनीही मोठा पराक्रम गाजवला त्यांचे कोपरगावात वास्तव्य होते. पराक्रमी लोकांचे स्मरण व्हावे त्यांचे विचार   मनात ठेवले पाहिजे. यासाठी आज थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आहे ब्राह्मण समाज हा पळपुटा नाही तर हातात तलवार घेतली तर भल्याभल्यांचे मुंडके छाटणारा हा समाज आहे ज्याला ज्या  भाषेत  उत्तर द्यायचं त्या भाषेत त्याला उत्तर द्यायला ब्राह्मण समाजाची क्षमता आहे असे ठणकावून सांगितले.

थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यातील  विशेष योगदानाबद्दल ब्राह्मण सभेच्या वतीने प्रसाद नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले प्रास्ताविक बांधकाम व्यवसायिक प्रसाद नाईक यांनी केले सूत्रसंचालन सचिव जयेश बडवे व शेवटी आभार उपाध्यक्ष बाळकृष्ण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष मकरंद को-हाळकर, उपाध्यक्ष बाळकृष्ण कुलकर्णी, सचिव सचिन महाजन, खजिनदार जयेश बडवे, संघटक महेंद्र कुलकर्णी, गौरीष लव्हुरीकर, सहसचिव संदीप देशपांडे सह खजिनदार योगेश कुलकर्णी, संघटक अजिंक्य पदे यासह कार्यकारणी सदस्य सौ. ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, प्रसाद नाईक, संजीव देशपांडे, सदाशिव धारणगावकर, अनिल कुलकर्णी, ॲड. श्रद्धा जवाद,वसंतराव ठोंबरे, डॉ. मिलींद धारणगांवकर सौ. वंदना चिकटे ब्राह्मण सभा सदस्यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

You cannot copy content of this page