कोपरगावची ख्याती जगभर पोहचविणाऱ्या ‘सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन रस्त्याची दुर्दशा’ 

कोपरगावची ख्याती जगभर पोहचविणाऱ्या ‘सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन रस्त्याची दुर्दशा’

The plight of the ‘richest railway station road’ that made Kopargaon famous all over the world

खड्ड्यांमुळे विदयार्थी त्रस्त; सार्वजनिक बांधकाम विभागाला पाऊस थांबण्याची प्रतीक्षा

Rajendara C. Salkar, 
News Portal, वृत्तवेध ऑनलाईन तू Thu24July 19.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :  ‌ कोपरगावची ख्याती देशभर पोहोचविणाऱ्या कोपरगाव नगर पालिका हद्दीतील साई तपोभूमी चौक ते रेल्वे स्टेशन या ‘सर्वात श्रीमंत रस्त्याची खड्ड्यामुळे दुर्दशा’ झाल्याने देशभरातून येणारे साई भक्त, विविध शैक्षणिक संस्थेत शिकणारे विद्यार्थी, विविध कारखान्यात काम करणारे कामगार व विविध प्रकारचा मालवाहतूक करणारे रिक्षा, स्कूल बस, दुचाकी वाहनचालक पादचारी त्रस्त झाले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

कोपरगाव साई तपोभूमी ते रेल्वे स्टेशन  रस्त्यावर कोपरगाव रेल्वे स्टेशन असून अतिशय देशभरातून साई भक्त या ठिकाणी येत असतात साई भक्तांच्या सोयीसाठी दौंड मनमाड मार्गावरील सर्व सुखसोयीनी युक्त असे आधुनिक रेल्वे स्टेशन केंद्रीय रेल्वेमंत्री बांधले आहे. देशातील सर्व  सुपरफास्ट एक्सप्रेस व रेल्वे गाड्या या ठिकाणी थांबतात. पुणतांबा रेल्वे स्थानकावरून गाडी व ट्रॅक बदलामुळे किमान दोन ते तीन तास साई भक्तांना ताटकळत उभे राहावे लागते त्यामुळे साई भक्त कोपरगाव रेल्वे स्टेशनला पसंती देतात कारण कोपरगाव रेल्वे स्टेशन वरून उतरून साई भक्तांना शिर्डी येथे जाण्यासाठी ४५ ते ६० मिनिटे लागतात त्यामुळे हे रेल्वे स्थानक साई भक्तांसाठी अतिशय सोयीचे आहे. त्याचप्रमाणे रेल्वेच्या माल धक्क्यावर मोठ्या प्रमाणात बालाजी ये जा होत असते.

संजीवनी तंत्रनिकेतन अभियांत्रिकी व जूनियर कॉलेज फार्मसी कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज इंग्लिश मीडियम स्कूल अशी संजीवनी  शैक्षणिक संस्था, संजीवनी युनिव्हर्सिटी, होस्टेल, व्यापारी संकुल, पेट्रोल पंप, बँका, पतसंस्था, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना स्वर्गीय नामदेवराव पाटील दूध संघ कोपरगाव तालुका औद्योगिक  वसाहतीतील मोठ-मोठाले कारखाने उद्योग, जिनिंग प्रेसिंग संस्था, पशुपैदास केंद्र, के बी पी विद्यालय सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालय, महिला महाविद्यालय, वीज वितरण कंपनीचे  132 के.व्ही स्टेशन महाविद्यालय इंजीनियरिंग कॉलेज, रेल्वे स्टेशन प्रवासी, कोल्हे कारखाना कामगार, व कामगार वसाहती, औद्योगिक वसाहत कामगार, गोदावरी दूध संघ कामगार, व येथील कामगार वसाहती, महिला महाविद्यालय, विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा रस्ता कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व आणि दक्षिण बाजूचे मुख्य द्वार म्हटले तरी चालेल या रस्त्यावर पूर्व बाजूला सहजानंदनगर, शिंगणापूर, नऊचारी, करंजी, पढेगाव, तिळवणी, शिरसगाव, गोधेगाव, कासली, उक्कडगाव, वैजापूर तर दक्षिण बाजूला संवत्सर, रामवाडी, दशरथ वाडी, लक्ष्मण वाडी, भोजडे, कान्हेगाव, सोमैय्या कारखाना, वारीगाव ही मोठ मोठी बागायतदार  गावं आहेत. या सर्वांना दळणवळणासाठी हा प्रमुख रस्ता आहे रेल्वे स्टेशनचे कारखाने शेती दूध औद्योगिक वसाहत हा शैक्षणिक संस्था, सर्व पसारा असल्यामुळेच कोपरगाव मतदार संघातील  ‘सर्वात श्रीमंत रस्ता’ आहे.

ऊस वाहतुकीच्या वाहनांसह वाढत्या वाहतुकीमुळे या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तसेच पावसामुळेही येथे खड्डे पडले असून, त्यामध्ये पाणी साचत आहे. त्याचा त्रास विद्यार्थ्यांबरोबर  वाहनचालकांना होत असून, त्यांना वाहने चालवताना कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते. खड्ड्यामुळे वाहने संथगतीने जातात व परिणामी सगळ्यांना कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच परिसरातील पादचाऱ्यांनाही या खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे वडांगळे वस्ती, बागुल वस्ती संजीवनी कारखाना परिसर,कालिका नगर अन्नपूर्णा नगर येथील रहिवाशांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन जावे लागते.
एवढ्या महत्त्वाच्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे गेल्या दोन-तीन वर्षापासून या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. मात्र आता  या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  अखत्यारीत असलेल्या  या समस्येकडे पुन्हा लक्ष देऊन हे खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी वाहनचालक व परिसरातील नागरिक करत आहेत.

रेल्वे स्टेशन रस्ता अत्यंत खराब स्थितीत आहेत खड्डे, चिखल,आणि डागडुजीअभावी रस्त्यांची दुरवस्थाझाली आहे. “सर्वात श्रीमंत रस्ता” असल्याने  हा, श्रीमंत रस्ता दर्जेदार व चांगला असण्याची अपेक्षा असते. परंतु, तेथील परिस्थिती किती वाईट आहे हे सांगण्यासाठीच ‌ “सर्वात श्रीमंत रस्त्याची दुर्दशा”, असे म्हणावे लागते.
कोपरगाव ची ख्याती देशभर नेणाऱ्या साई भक्तांचा विचार करतात ‘सर्वात श्रीमंत रस्त्याची दुर्दशा’ ही शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी चिंतेची बाब आहे. 

कोट

सकाळी कॉलेजला जायची लगबग असते घाई असते अशावेळी”रस्त्यावर खड्डे आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघातही घडले आहेत.त्यात आता पावसाचे पाणी साचल्याने पाण्यातून वाहन गेल्यास रस्त्यावरून पायी चालणाऱ्यांवर ते पाणी उडते.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही.” – विद्यार्थी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

आम्ही सातत्याने या रस्त्याची डागडुजी करीतच असतो. परंतु रस्त्याच्या दुभारा असलेल्या उंच झालेल्या गटारामधून  पाणी जात नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल व पाणी साचून रस्ता खराब होत आहे.”पाऊस थांबल्यावर या रस्त्याची डागडुजी केली जाईल, तसेच जसजसे डांबर मिळेल, तसे रस्त्याचे काम केले जाईल.”- शक्यतो हा रस्ता सिमेंट करना काँक्रिटीकरण व्हावा यासाठी विशेष प्रस्ताव पाठविणार आहोत – वर्षराज शिंदे सहाय्यक अभियंता  कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभाग

Leave a Reply

You cannot copy content of this page