एक राखी जवानांसाठी” वीर जवानांच्या त्यागामुळे आपण सण साजरे करू शकतो- सौ रेणुका कोल्हे

एक राखी जवानांसाठी” वीर जवानांच्या त्यागामुळे आपण सण साजरे करू शकतो- सौ रेणुका कोल्हे

“One Rakhi for the soldiers” We can celebrate festivals because of the sacrifice of brave soldiers – Mrs. Renuka Kolhe

सैनिकांसाठी राखी जमा करण्याच्या स्टॉलचे रेणुका कोल्हे यांच्या हस्ते झाले सुरुवात

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन 3Aug 16.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव:   सीमेवर आपल्या रक्षणासाठी अहोरात्र सज्ज असलेल्या वीर जवानांच्या त्यागामुळेच आपण सण साजरे करू शकतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही.‌ तुमच्यासारखे जवान देशाचा अभिमान आहे. राखीच्या निमित्ताने प्रेमाचे आणि आपुलकीचे बंधन पोहोचवणे ही आपल्या संस्कृतीतील एक अनोखी भावना आहे. हा उपक्रम प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीचा नवा दीप प्रज्वलित करत असल्याच्या भावना संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.रेणुका कोल्हे यांनी व्यक्त केले.

सैनिकांसाठी राखी जमा करण्याच्या स्टॉलचे शनिवारी (२ ऑगस्ट) रोजी सौ. रेणुका कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या 

भारतीय सैनिक देशांच्या सीमांचे संरक्षण करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सीमेवर पहारा देत असतात. त्यांचं आणि आपलं नातं सुरक्षेच्या बंधनात अतूट बांधण्यासाठी, ते आणखी घट्ट करण्यासाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे दरवर्षी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम राबवीत असल्याने शहरातील शेकडो  महिला भगिनी यात सहभागी होतात.

लाडक्या बहिणींनी भावासाठी पाठविलेल्या या राख्या जम्मू काश्मीर येथील सीमेवर देशाचे संरक्षण करणा-या वीर जवानांच्या हातावर बांधल्या जाणार आहेत. यासाठी सोमवारी(४ ऑगस्ट) रोजी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक शिर्डी येथून जम्मू काश्मीर साठी जाणार आहेत.

गतवर्षी देखील हजारो महिला भगिनींनी आपल्या हस्तकलेने सजवलेल्या राख्या तयार करत देशभक्तीचा संदेश दिला. हा उपक्रम सर्वत्र एक आगळा-वेगळा उपक्रम म्हणून सर्वत्र कौतुकास पात्र ठरत असून, यासाठी  महिला भगिनींनी मोठ्या संख्येने आपली राखी पाठवावी असे आवाहन युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे

या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्या सोनवणे, अनिता गाडे, सविता मोरे, प्रियंका जगझाप, कलाबाई लकारे, सविता परदेशी, सुरेखा आवारे  प्रशांत कडू, फकीर महम्मद पहिलवान, संजय खरोटे, पंकज कु-हे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page